Saturday, March 2, 2024

Latest Posts

अधिवेशनात गॅलरी पासेस देणं बंद – निलम गोऱ्हें

संसदेचं कामकाज सुरु असताना दोन जणांनी प्रेक्षक गॅलरीतून उडी मारल्याची घटना घडली. या घटनेमुळं देशभरात खळबळ उडाली आहे.

संसदेचं कामकाज सुरु असताना दोन जणांनी प्रेक्षक गॅलरीतून उडी मारल्याची घटना घडली. या घटनेमुळं देशभरात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर राज्य विधीमंडळाच्या नागपूर अधिवेशनातही आता गॅलरी पासेस देणे बंद केले आहे. दोन्ही सभागृहात गॅलरी पास देणं बंद केलं आहे. लोकसभा गॅलरीतून दोघांनी सभागृहात उडी मारल्याने विधिमंडळाने तात्काळ हा निर्णय घेतला आहे. विधान परिषद उपासभापती डॉ. निलम गोऱ्हे यांची सभागृहात माहिती यांनी दिली.

विधानसभेत आता आमदारांना फक्त दोन पास दिले जाणार
विधानसभेत आता आमदारांना फक्त दोन पास दिले जाणार आहेत. अधिवेशन कालावधीत गर्दी नको म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. संसदेतील आजच्या घटनेनंतर ही भूमिका घेण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात याबाबतची माहिती दिली. लोकसभेतील घटनेनंतर विधिमंडळ सचिवांनी सुरक्षेचा आढावा घेतला आहे. विधिमंडळ परिसरातील सुरक्षा कडक करण्याचे आदेश सचिवांनी दिले आहेत. विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद उपसभापती यांनी देखील विधिमंडळ परिसरातील सुरक्षेबाबत विधीमंडळ सचिवांकडून माहिती घेतली आहे.

संसदेत नेमकं काय घडलं?
संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरु असताना सुरक्षेत मोठी (Security Breach) झाल्याचं समोर आलं आहे. कारण प्रेक्षत गॅलरीत (Audience Gallery) बसलेल्या एकाने खाली उडी मारली. भर लोकसभेत (Lok Sabha) हा प्रकार घडल्याने काहीसा गोंधळ उडाला. तीन जण प्रेक्षक गॅलरीत बसले होते. त्यापैकी एकाने गॅलरीतून खाली उडी मारली. त्याच्याकडे कलर स्प्रे (Color Spray) असल्याची माहिती मिळत आहे. स्प्रे आणि काही धूरसदृश्य वस्तूही आढळली. लोकसभेतील या प्रकारामुळे पुन्हा एकदा सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. दोन लोक खाली पडले. त्यानंतर अचानक धूर सुरु झाला. या दोघांना पकडण्यात आलं आहे. या प्रकारानंतर लोकसभेचं कामकाज थांबवण्यात आल्याची माहिती एका खासदाराने दिली आहे. दरम्यान, ज्या व्यक्तीनं गॅलरीतून उडी मारली त्यापैकी एकाचं नाव सागर असल्याचं समजतं. तो कर्नाटकातील म्हैसूरच्या खासदाराच्या ओळखीने आल्याची माहिती मिळत आहे. या व्यक्तीने आपल्याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी स्मोक कँडल पेटवले.

हे ही वाचा : 

KL Rahul ने बुमराहबद्दल सांगितली एक गोष्ट, म्हणाला…

लोकसभेच्या सुरक्षेत मोठी चूक

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Latest Posts

Don't Miss