Tuesday, May 14, 2024

Latest Posts

आगामी लोकसभा निवडणुकीत कळसाला भगवा फडकवायचा आहे – उद्धव ठाकरे

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पुढील काही दिवस कोकणच्या दौऱ्यावर असणार आहेत.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पुढील काही दिवस कोकणच्या दौऱ्यावर असणार आहेत. आज ते रायगड मधील काही मतदारसंघांना जाऊन भेटी देणार आहेत. आज त्यांनी पेण आणि अलिबागमधील चौल या ठिकाणी भेट दिली. तिथे त्यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, भगवा एकच आहे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि आपल्या शिवसेनेचा, दुसऱ्या शिवसेनेचा भगवा आम्हाला मान्य नाही आणि भाजपचे फडके तर अजिबात नाही. ‘माझा पक्ष चोरायची तुमची लायकी नाही’ असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर थेट निशाणा साधला आहे.

महाराष्ट्र हा लेचापेचा देश नाही. लाचार भेकड, मिंदे हे भाजपासोबत गेले आहेत. हे कधी नेते चोरतात,कधी महापुरुष चोरतात. नितीशुन्य, विचारशून्य पक्ष देशावर १० वर्ष राज्य करतोय, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. आगामी लोकसभा कळसाला भगवा फडकवायचा आहे, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीचे देखील रणशिंगं फुंकली आहेत. दाला साजेसा निर्णय देण्याची त्यांना संधी होती. पण लाचारीमुळे, दलालीमुळे समोर येणार कागद वाचावा लागतो. लोकशाहीचा कायद्याचा मुडदा पाडताना सर्व जग तुमच्याकडे पाहतंय, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी राहुल नार्वेकर यांच्यावर निशाणा साधला आहे. अर्थसंकल्प मांडणारे हे सरकार पुढच्या वेळी नसेल. हे सरकार पुढे येणार नाही. १० वर्ष सत्ता भोगल्यानंतर त्यांना साक्षात्कार झाला आहे. महिला , शेतकरी , गरीब , तरुण या चार जाती सरकारला दिसत आहेत. दुसरीकडे राज्यात जातीचे सर्वेक्षण सुरू आहे. दुर्वैवाने यांचे सरकार आलं की कमी केलेले गॅस, पट्रोल परत वाढणार,असे उद्धव ठाकरे म्हणाले.

नितेश कुमार यांना फोडले. आता बिहारला ५ लाख कोटीचे पॅकेज द्या, आम्हाला अडचण नाही. १० वर्ष लागली राम मंदिर बांधायला. कोर्टाच्या आदेशाने मंदिर तयार झाले. आमची शिवसेना सुद्धा त्या आंदोलनामध्ये होती. मी राम मंदिराचा आनंद नाशिकमध्ये साजरा केला. या देशासाठी जो मरायला तयार आहे, तो माझा. मुस्लिम असला तरीही चालेल. राम आमच्या हृदयात आहे, हाताला काम देणारा राम पाहिजे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. जेव्हा निसर्ग वादाळामुळे जे नुकसान झाले त्यावेळेस मी मुख्यमंत्री होतो. तेव्हा मी मदत केली. केंद्राच्या निकषाच्या पलीकडे जाऊन मी मदत केली होती. केंद्राने एकही पैसा दिला नव्हता. आता पंतप्रधान मोदी तुमच्या झोपडीत येऊन राहतील, आश्वासन देतील, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

हे ही वाचा:

केंद्रीय बजेट जाहीर झाल्यानंतर आमदार अमोल मिटकरींनी दिली प्रतिक्रिया

UNION BUDGET 2024: विकसित भारताची पायाभरणी करुन देशवासियांची मनं जिंकणारा अर्थसंकल्प- Ajit Pawar

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss