केंद्र सरकारने आज देशाचे अंतरिम अर्थसंकल्प (Budget) जाहीर केले. मोदी सरकारच्या काळातील हा शेवटचा अर्थसंकल्प आहे. आज जाहीर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पावर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी आपली प्रतिक्रिया मांडली आहे. अमोल मिटकरी म्हणाले, देशाच्या अत्यंत वाईट काळात देशाला प्रगतीपथावर नेणारा हा अर्थसंकल्प आहे. तर या अर्थसंकल्पावर अनेकांनी टीका केली आहे. विरोधकांवरही त्यांनी शरसंधान साधला आहे. आमदार रोहित पवार ईडी चौकशीवरून नाटक करत असल्याची टीका अमोल मिटकरी यांनी केली आहे. तसेच आज रोहित पवार यांच्यासोबत प्रतिभा पवार गेल्या होत्या.या वयात प्रतिभा पवारांना ईडी (ED) कार्यालयापर्यंत सोबत नेण्यावरून, अमोल मिटकरी यांनी रोहित पवारांवर टीका केली आहे.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी म्हणाले, आज जाहीर करण्यात आलेले बजेट सर्वसामान्य नागरिकांना न्याय देणारे आहे. आजच्या अर्थसंकल्पामध्ये केंद्र सरकारने सर्वसामान्य महिला, अंगणवाडी सेविका यांच्या हिताचा विचार करून योजना जाहीर केल्या आहेत. विरोधकांनी अर्थसंकल्पाचा अभ्यास करून नंतर त्यांवर टीका करावी. विरोधकांना बजेट मधलं काही समजत नाहीये, असे मिटकरी म्हणाले. जर काही चुकीचे केले नसेल तर रोहित पवार ईडी चौकशीला का घाबरतात?
स्वतःला ‘संघर्षयोद्धा’ म्हणवणाऱ्या रोहित पवारांची चौकशीवरून सहानुभूती घेण्यासाठी स्टंटबाजी केली जात आहे. अजित पवारांना चौकशीसाठी बोलावले तेव्हा शरद पवार प्रतिभाकाकी किंवा सुप्रिया सुळे सोबत का गेल्या नव्हत्या. यासोबतच जयंत पाटील आणि प्राजक्त तनपुरे यांची चौकशी होतांना यातले कुणीच का सोबत गेले नाही. या वयात प्रतिभाकाकींना चौकशी कार्यालयापर्यंत सोबत घेऊन जाणे हेच चीड आणणारे आहे, असे अमोल मिटकरी म्हणाले.
हे ही वाचा:
UNION BUDGET 2024: विकसित भारताचा संकल्प सांगणारा अर्थसंकल्प – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
डाळिंबाच्या सालीचे ‘हे’ आहेत गुणकारी फायदे, ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल