Wednesday, February 28, 2024

Latest Posts

छगन भुजबळमध्ये किती दम आहे, हे आपण पाहून घेऊ : मनोज जरांगे

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे हे चौथ्या टप्प्यातील महाराष्ट्र दौरा करत आहेत.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे हे चौथ्या टप्प्यातील महाराष्ट्र दौरा करत आहेत. त्यांची आज बीड जिल्ह्यातील धारूर शहरातील मोंढा मैदानावर त्यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी पुन्हाएकदा आपल्या सभेतून सरकार आणि मंत्री छगन भुजबळांवर (Chhagan Bhujbal) यांच्यावर निशाणा साधला आहे. आमच्या हातात दंडूके आहे, मराठा समाज सरकारलाही पायाखाली तुडवू शकतो आणि भुजबळांमध्ये किती दम आहे पाहून घेऊ,असे वक्तव्य मनोज जरांगे यांनी त्यांच्या सभेत केले आहे.

दरम्यान, बीडच्या सभेमध्ये बोलतेवेळी मनोज जरांगे म्हणाले, त्याचं ऐकून मराठ्यांना आरक्षण दिले जाणार नसेल, तर गाठ मराठ्यांसोबत आहे. एकदा आरक्षण मिळू द्या, मग मी त्याच्याकडे बघणार आहे. खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांचा देखील आरक्षण मिळाल्यावर हिशोब करणार आहे. गोळीबार, लाठीमार होऊन देखील आंदोलक अजून मागे हटलेले नाहीत. ३०७ सारखे गंभीर गुन्हे आपल्यावर दाखल केले. पहिल्यांदा एवढं निर्दयी आणि निष्ठुर सरकार पाहिलं. सरकार किती लोकांना अडकवणार आहे. लक्षात ठेवा ६ कोटी मराठा आहे, असे मनोज जरांगे म्हणाले आहेत. छगन भुजबळ यांचे ऐकून अन्याय करायचा असेल, तर सरकारला मराठा समाज सोडणार नाही. छगन भुजबळमध्ये किती दम आहे, हे आपण पाहून घेऊ. मराठा आरक्षणाचे पुरावे असतानाही आरक्षण दिले नाही. मराठा समाजाने इतरांसाठी छातीचा कोट केला, मात्र तेच लोक आता मराठा समाजाला विरोध करत आहेत. आत्तापर्यंत ३९ लाख मराठा लोकांना आरक्षणाचा लाभ मिळाला आहे. आरक्षण नसल्याने मराठयांच्या नोकरीचा टक्का कमी झाला. त्यांना माहित नाही आमच्या हातात दंडूके आहेत. काही लोक जातीवाद निर्माण करून दंगली घडवण्याचा प्रयत्न करत आहेत. आरक्षणासाठी मी खूप अपमान सहन केला, पण समाजाने संयम ठेवावा. तर, मराठा समाज सरकारला पायाखाली तुडवू शकतो, असे देखील मनोज जरांगे सभेमध्ये म्हणाले आहेत.

बीड जिल्ह्यातील धारूर येथे मनोज जरांगे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यांच्या या सभेला आजूबाजूच्या मराठा बांधवानी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. त्यामुळे सभेच्या ठिकाणी पाय ठेवण्यास देखील जागा नव्हती. दरम्यान, मनोज जरांगे यांचं भाषण सुरु असताना अचानक त्या ठिकाणी एक रुग्णवाहिका आली. त्यावेळी सभेला उपस्थित बांधवानी रुग्णवाहिकेला तात्काळ जागा करून दिली.

हे ही वाचा : 

मार्गशीर्ष महिन्यात देवी महालक्ष्मीच्या व्रताचे खास  महत्व,जाणुन घ्या महालक्ष्मीच्या पूजेची पद्धत आणि महत्तव

भजनलाल शर्मा राजस्थानचे नवे मुख्यमंत्री

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss