Thursday, March 28, 2024

Latest Posts

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निकाल ३ टक्यांनी घटला

गेल्या अनेक दिसवसांपासून विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे बारावीच्या निकालाकडे लक्ष हे लागले होते. आज अखेर दुपारी २ वाजता बारावीचा निकाल हा जाहीर झाला आहे.

गेल्या अनेक दिसवसांपासून विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे बारावीच्या निकालाकडे लक्ष हे लागले होते. आज अखेर दुपारी २ वाजता बारावीचा निकाल हा जाहीर झाला आहे. यंदा बारावी बोर्डाचा निकाल ९१.२५ टक्के लागला आहे. यंदाच्या वर्षी बारावीच्या परीक्षेत १२ लाख ९२ हजार ४६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. हा निकाल मागील वर्षापेक्षा कमी आहे.

यंदाच्या वर्षी निकाल हा जाहीर तर झाला आहे तर परंतु मागील वर्षी पेक्षा या वर्षीचा निकाल २.९७ टक्क्यांनी कमी झाला आहे. तसेच दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मुलींनीच बाजी मारली आहे. यावर्षी ९३.७३ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर ८९.१४ टक्के मुलं उत्तीर्ण झाले आहेत. यंदाच्या वर्षीची बारावीची परीक्षा ही ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. तसेच कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा मात्र परीक्षा घेताना कोणतीही सवलत देण्यात आली नव्हती परिणामी याचा परिणाम निकालावर पाहायला मिळत आहे. मात्र कोरोना आधीच्या म्हणजे फेब्रुवारी – मार्चमध्ये लागलेल्या निकालापेक्षा यावेळचा निकाल ०.५९ ने अधिक आहे.

मागील तीन वर्षाचा तुलनात्मक निकाल

शाखा     विज्ञान      कला      वाणिज्य     व्यवसाय अभ्यासक्रम     एकूण

2020    96.93    82.63    91.27      86.07                  90.66

2021    99.45    99.83    99.91      98.80                  99.63

2022    98.30    90.51    91.71      92.40                  94.22

2023    96.09    84.05    90.42      89.25                  91.25

बारावीचा विभागवार निकाल

कोकण – ९६.०१ टक्के
पुणे – ९३.३४ टक्के
कोल्हापूर – ९३.२८ टक्के
औरंगाबाद – ९१.८५ टक्के
नागपूर – ९०.३५ टक्के
अमरावती – ९२.७५ टक्के
नाशिक – ९१.६६ टक्के
लातूर – ९०.३७ टक्के
मुंबई – ८८.१३ टक्के

हे ही वाचा:

सीईटी परीक्षांचे निकाल जाहीर, प्रवेश फेरीचे वेळापत्रक होणार लवकरच जाहीर

अखेर प्रतीक्षा संपली!, HSC चा निकाल उद्या दुपारी २ वाजता जाहीर होणार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss