Tuesday, January 16, 2024

Latest Posts

MAHARASHTRA: CM SHINDE यांच्याकडून धान्याला हेक्टरी २० हजारांचा बोनस जाहीर

विदर्भातील रामटेक विधानसभा मतदारसंघाचे आमदार आशिष जयस्वाल यांच्या पुढाकाराने राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आणि इंटकचे पदाधिकारी तसेच ८०० हून अधिक कार्यकर्त्यांनी  रामटेक या निवासस्थानी उपस्थित राहून शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी या सर्वांचे पक्षात स्वागत करीत त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यात इंटकचे पदाधिकारी धनंजय सिंह, सतीश सिंह, राहुल सिंह यांचा समावेश होता. तसेच रामटेक विभागासाठी जितेंद्र घोलपकर आणि निखिल कडू यांना वैद्यकीय मदत कक्षाचे सहाय्यक म्हणून नियुक्तीपत्रे सुपूर्द करण्यात आली. यावेळी आमदार आशिष जयस्वाल, आमदार प्रताप सरनाईक, शिवसेनेचे पूर्व विदर्भ संघटक किरण पांडव तसेच शिवसेनेचे विदर्भातील सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

ज्याठिकाणी सुपीक जमीन असते तिथे शेती कुणीही करू शकतो मात्र कोरडवाहू जमिनीवर शेती करणे हे सोपे काम नसते. विदर्भातील रामटेक सारख्या मतदारसंघात चार वेळा निवडून येणे हे तेवढेच अवघड काम आहे जे आशिष जयस्वाल यांनी करून दाखवले आहे. त्यांच्या पाठीशी कायम उभे राहिल्याबद्दल त्यांच्या सहकाऱ्यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आभार मानले. नागपूर शहरी भागातील लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश संपन्न झाला असतानाच ग्रामीण भागांतील पदाधिकाऱ्यांनी देखील पक्षात प्रवेश केला आहे. आपल्या आमदारामुळे नागरिकांना प्रत्यक्ष लाभ मिळू शकणारी कामे पूर्ण झाली आहेत. त्यांच्या विभागात झालेल्या धान्य शेतीच्या नुकसानीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः जाऊन पाहणी केली. अवघ्या १५ दिवसांच्या आत त्यांना मदत दिली असून अजूनही मदत मिळेल. धान्याला हेक्टरी २० हजारांचा बोनस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला. एवढ्यावरच न थांबता शेतकऱ्यांना ४४ हजार कोटींहून अधिक रक्कमेची मदत वेगवेगळ्या माध्यमांतून देण्याचा प्रयत्न सरकारने केला असून हे सरकार शेतकरी, कष्टकरी यांना न्याय देणारे हे सरकार आहे असे मत यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.

राज्य शासनाच्या माध्यमातून ६५ सिंचन प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिली असून त्यात रामटेक मतदारसंघातील किंसीपूरक कालव्याच्या देखील समावेश असल्याचे यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. विदर्भात शिवसेनेच्या वाढीसाठी आपण साऱ्यांनी आवर्जून प्रयत्न करावेत, तुम्हाला लागेल ती सर्व मदत नक्की करू अशी ग्वाही यासमयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

हे ही वाचा:

आयपीएल २०२४ साठी दुबईमध्ये लिलाव सुरु

IPL Auction 2024, शार्दुल ठाकूर खेळणार चेन्नई सुपर किंग्जकडून…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss