Tuesday, May 21, 2024

Latest Posts

कोथरूडमध्ये रंगणार ‘महाराष्ट्र केसरी’; बृजभूषण सिंह लावणार हजेरी?

कुस्ती प्रेमींसाठी एक खुश खबर आहे. ती म्हणजे या वर्षी महाराष्ट्र केसरी सपर्धा लवकरच डिसेंबर महिन्यात आयोजित करण्यात येणार आहे. कुस्तीचा (wrestling) कुंभमेळा असणाऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धा या वर्षाच्या अखेरीस होणार आहेत. ९०० कुस्तिगिरांनी स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे. महाराष्ट्र केसरीचा थरार डिसेंबरमध्ये रंगणार आहे. महाराष्ट्रातील ३३ जिल्ह्यांतील ११ महापालिकांमध्ये ४५ तालीम संघातील ९०० मल्ल स्पर्धेत सहभाग घेणार आहेत. नामांकित ४० मल्लसुद्धा या स्पर्धेत भाग घेणार आहेत.

महारष्ट्र केसरीच आयोजन ह्या वर्षाच्या शेवटच्या महिन्यात करण्यात येणार आहे. अजून तारखेची घोषणा झाली नसून डिसेंबर महिन्यात ६ दिवस ही प्रतियोगिता असणार आहे. मात्र स्पर्धेचे ठिकाण कोथरूड मध्ये होण्याची शक्यता आहे, संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी ही माहिती दिली. स्पर्धेच्या उद्घाटनाला केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) येणार आहे. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह (Brij Bhushan Singh) उपस्थितीत राहण्याची शक्यता आहे.

२००८ पासून विजेत्यांना चांदीची गदा आणि ५१ हजार रुपये रोख रक्कम मिळू लागली. या स्पर्धेतील विजेते सरकारी नोकरीसाठी क्रीडा शेत्रातील राखीव जागांसाठी अर्ज करू शकतात. मुंबईच्या नरसिंग यादव (Narsingh Yadav) याने २०११ ते २०१३ असे सलग तीन किताब मिळवले तर २०१४ ते २०१६चा महाराष्ट्र केसरी जळगावचा (Jalgaon) विजय चौधरी हा आहे. महाराष्ट्र केसरी ही माती व गादी (मॅट) विभाग मध्ये होते. यामध्ये माती विभागातील विजेता मल्ल व गादी विभागातील विजेता मल्ल यांच्यात महाराष्ट्र केसरी गदे साठी अंतिम लढत आंतरराष्ट्रीय नियमांनुसार मॅट वर होते, आणि या अंतिम लढती मधील विजेता मल्ल हा ‘महाराष्ट्र केसरी’ म्हणून घोषीत करून महाराष्ट्र केसरीची मानाची गदा बहाल केली जाते.
महाराष्ट्र केसरी १९६१- २०१८ कुस्ती महर्षी मामासाहेब मोहोळ यांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र राज्य किस्तीगीर परिषद संस्थे अंतर्गत गेली सहा-सात दशकापासून राज्यातील सर्वोच्च अशा ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. कुस्ती टिकावी, ईथल्या मातीतून चांगले मल्ल तयार होऊन ते देश विदेशात देखील चमकावे हाच उद्देश या स्पर्धेचा असतो.

हे ही वाचा:

प्रहारचे अध्यक्ष बचू कडू यांना न्यायालयाकडून झटका, १४ दिवस न्यायालयीन कोठडी

दसऱ्याच्या मुहूर्तावर रिलीज होणार प्रभास आणि सैफ अली खानच्या आदिपुरुषचा टीझर?

एमसीए निवडणुकीत शरद पवार यांचा संदीप पाटील, राजू कुलकर्णी यांना आशीर्वाद

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss