Saturday, July 27, 2024

Latest Posts

MAHARASHTRA: प्रदीर्घ लढ्याला यश! स्वाधारच्या धर्तीवर ओबीसी विद्यार्थ्यांसाठी आधार

इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती, आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना शासनाकडून मंजूर करण्यात आल्याची माहिती मंत्री चंगण भूजबळ यांच्याकडून देण्यात आली. याबाबतचे ट्वीट मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.

वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना वार्षिक खर्चासाठी आदिवासी विकास विभागाच्या पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम व सामाजिक न्याय विभागाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर ‘स्वाधार’ योजनाच्या धर्तीवर इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रति जिल्हा ६०० याप्रमाणे एकूण २१,६०० विद्यार्थ्यांकरिता ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना’ राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे.

या योजनेंतर्गत भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा स्वतः उपलब्ध करुन घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांक संलग्न असलेल्या बँक खात्यात थेट रक्कम वितरीत करण्यात येणार आहे. मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी- चिंचवड, नागपूर या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ६० हजार रुपये, इतर महसुली विभागीय शहरातील व उर्वरित क वर्ग महानगरपालिका क्षेत्रामध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ५१ हजार रुपये, इतर जिल्ह्याचे ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ४३ हजार रुपये आणि तालुक्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ३८ हजार रुपये याप्रमाणे प्रतिवर्षी प्रत्येक विद्यार्थ्याला दिले जाणार आहेत.

Image

या योजनेसाठी १०० कोटी रुपये इतक्या वार्षिक खर्चास मान्यता देण्यात आली आहे. यामुळे सर्वसामान्य ओबीसी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी खूप मोठा आधार मिळणार आहे. ओबीसी विद्यार्थ्यांच्या व समाजाच्या हितासाठी आपण सदैव कटिबद्ध असल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले.

हे ही वाचा : 

आपल्या जुन्या संसद भवनातही अशा प्रकारच्या घटना घडल्या – राजनाथ सिंह

छत्रपती शिवाजी‎ महाराजांच्या स्मारकासमोर केली आत्महत्या, आरक्षणाच्या मागणीसाठी आणखी एक बळी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss