Saturday, July 27, 2024

Latest Posts

छत्रपती शिवाजी‎ महाराजांच्या स्मारकासमोर केली आत्महत्या, आरक्षणाच्या मागणीसाठी आणखी एक बळी

मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यभरात सगळीकडे तापला आहे.

मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यभरात सगळीकडे तापला आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी आत्तापर्यंत अनेक तरुणांनी आत्महत्या केली आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी होत असलेल्या आत्महत्या (Suicide) सुरूच आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील खामगाव (गोरक्ष)‎‎ आणखी एका व्यक्तीने आत्महत्या केली आहे. या ३९ वर्षीय तरुणाने छत्रपती शिवाजी‎ महाराजांच्या स्मारकासमोरच ‎‎विष‎ ‎घेऊन आत्महत्या केल्याने सगळीकडे खळबळ उडाली आहे. बुधवारी १३ डिसेंबर रोजी ४ वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. विजय ‎पुंडलिक राकडे (वय ३९ वर्ष, खामगाव, फुलंब्री) असे मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे हे महाराष्ट्रातील अनेक भागात दौरा करत आहेत. आरक्षणाच्या आंदोलनात विजय देखील सहभागी होता. मात्र, तो मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्यामुळे चिंतेमध्ये होता. याच चिंतेत त्याने बुधवारी खामगाव येथील छत्रपती शिवाजी‎ महाराजांच्या स्मारकासमोरच विष घेतले. त्याने विष घेतल्याचे लक्षात येताच गावकऱ्यांनी आणि नातेवाईकांनी त्याला‎ तत्काळ खासगी वाहनातून फुलंब्री येथे‎ रुग्णालयात केले. मात्र, त्यांची प्रकृती आणखीन बिघडल्यामुळे त्याला ‎रुग्णवाहिकेद्वारे छत्रपती‎ संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात ‎दाखल करण्यात आले. पण त्याला डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मी आत्महत्या करत असल्याची चिठी त्याच्या खिशात आढळून आली आहे.

विजयने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट देखील लिहून ठेवली आहे. ज्यात त्यांनी लिहिले आहे, माझ्या‎ मुलींना, मुलांना शिकवण्यासाठी मी‎पूर्णपणे कटिबद्ध असतानाही माझ्या‎ मुलांना आरक्षण नसल्याने भविष्यात‎ त्यांच्यासाठी मी काही करू शकत नाही‎. येणाऱ्या काळात मराठ्यांना आरक्षण‎ मिळावे, यासाठी मी आत्महत्या करीत ‎आहे, असे सुसाईड नोटमध्ये लिहण्यात आले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे हे आंदोलन करत आहेत. मात्र हा मुद्दा लवकर मार्गी लागत नसल्याने हताश होऊन तरुण आत्महत्या सारखी टोकाचे पाऊल उचलत आहे.

हे ही वाचा:

Nana Patole यांचा थेट हल्लाबोल, भाजप शिवरायांचा महाराष्ट्र पेटवतंय…

संसदेत झालेल्या गोंधळावर संजय राऊतांनी दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss