Saturday, July 27, 2024

Latest Posts

MAHARASHTRA: त्यांना पवार साहेबांची भीती वाटते, काय म्हणाले जयंत पाटील? 

सध्या महाराष्ट्राचे राजकारण वेगळ्या स्थितीने चालू आहे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री (CM OF MAHARASHTRA) आरक्षणाविषयी योग्य निर्णय घेऊ शकत नाही. 

पनवेल मधील कळंबोलीत शरद पवार (SHARAD PAWAR) गटाच्या कार्यकर्त्यांकडून स्वाभिमान मेळाव्याचे (SWABHIMAN MELAVA) आयोजन करण्यात आले होते. हा मेळावा पनवेल (PANVEL) मधील शरद पवार गटाचे अध्यक्ष सतीश पाटील (SATISH PATIL) यांच्या नेतृत्वाखाली कळंबोलीतील न्यू इंग्लिश स्कूल (NEW ENGLISH SCHOOL) मैदानात पार पडला. या स्वाभिमान मेळाव्याला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (JAYANT PATIL) तसेच अमोल कोल्हे (AMOL KOLHE) यांच्या सह इतर कार्यकर्ते उपस्थित होते. या स्वाभिमान मेळाव्याला शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. या मेळाव्याच्या निमित्ताने २०० किलो मिठाच्या माध्यमातून आकर्षक रांगोळी साकारण्यात आली होती. शरद पवार गटाचे मिठाप्रमाणे जागणारे कार्यकर्ते आहेत असा मिठाच्या रांगोळीच्या माध्यमातून संदेश देण्यात आला.

 

नवी मुंबईतील कळंबोली येथे आयोजित स्वाभिमान सभेतून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी जनसमूदायाला संबोधित केले.

काय म्हणाले जयंत पाटील? 

आज आपण या ठिकाणी पक्ष संघटना जोडण्यासाठी जमलेलो आहोत. पवार साहेबांनी कायम माणसं जमा केली, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गेले २५ वर्ष सर्वत्र कसा पोहोचेल याकडे लक्ष दिले. आज आमच्यातून काही लोक आम्हाला सोडून गेलेले आहेत, परंतु आज पवार साहेबांच्या मागे सर्वसामान्य कार्यकर्ता छातीचा कोट करून साहेबांच्या मागे खंबीरपणे उभा आहे. पवार साहेबांची पुण्याई हे आपल्या सर्वांच्या कामाचे भांडवल आहे. महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचा एकमेव कार्यक्रम आहे तो म्हणजे, पवार साहेबांवर टीका करणे; आजही महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्या पक्षाची बांधणी जोडणीबाबत सूत्र सांगण्याऐवजी पवार साहेबांवर निम्मा वेळ खर्च करून पवार साहेबांवर टीका करण्यात धन्यता मानली. का ? तर, त्यांना पवार साहेबांची भीती वाटते. पवार साहेबच भारतात फिरणारा अश्वमेध महाराष्ट्रात घडवू शकतात हे सर्वांना माहीत आहे, म्हणून त्यांनी साहेबांवर टीका केली. सध्या महाराष्ट्राचे राजकारण वेगळ्या स्थितीने चालू आहे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री (CM OF MAHARASHTRA) आरक्षणाविषयी योग्य निर्णय घेऊ शकत नाही.

हे ही वाचा:

Latest Posts

Don't Miss