Friday, May 17, 2024

Latest Posts

महाराष्ट्रात ऊन-पावसाचा खेळ, हवामान खात्याने वर्तवला ‘हा’ अंदाज

सध्या महाराष्ट्रात उन्हाच्या झळा वाहत आहेत. गेल्या दोन आठवड्यांत हवामानात बदल झालेला असून तापमानात प्रचंड वाढ झालेली आहे. हवामान विभागाने काही भागांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. या कडक उन्हात नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन हवामान विभागाने केलं आहे.

सध्या महाराष्ट्रात उन्हाच्या झळा वाहत आहेत. गेल्या दोन आठवड्यांत हवामानात बदल झालेला असून तापमानात प्रचंड वाढ झालेली आहे. हवामान विभागाने काही भागांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. या कडक उन्हात नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन हवामान विभागाने केलं आहे. तर महाराष्ट्रातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये पुढील २४ तासांत अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेची शक्यता हवामान खात्याने नोंदवली आहे. मराठवाडा व मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये रात्री तापमान वाढीची शक्यता असून कोकणातील काही भागांमध्ये उष्णतेची लाट व दमट हवामान राहील. उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये उष्णेतेच्या लाटेची शक्यता असून मराठवाड्यातील काही भागांमध्ये व विदर्भातील तुरळक भागांमध्ये विजेच्या कडकडटासह हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याने दर्शवली आहे.

कोकणातील काही भागांमध्ये हवामान दमट व उष्ण राहील. ठाणे आणि मुंबईसह कोकणात उष्णतेच्या लाटेचा अंदाज हवामान खात्याने नोंदवला आहे. मुंबई मध्ये पुढील २४ तास आकाश निरभ्र राहणार असून कमाल आणि किमान तापमान ३४ अंश सेल्सिअस ते ३६ अंश सेल्सिअस राहील. देशातील तापमान स्थिती पाहायची झाली तर २ मे रोजी नागालँड, मिझोरम, त्रिपुरा आणि मणिपूर येथे मुसळधार पाऊस किंवा अतिवृष्टीची शक्यता हवामान खात्याने दर्शवली आहे. अरुणाचल प्रदेश मध्ये २ मे रोजी अतिवृष्टीचा अंदाज आहे. आसाम आणि मेघालय मध्ये देखील मुसळधार ते अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने सांगितली आहे. बिहार, झारखंड, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, ओडिशा, सौराष्ट्र, गुजरात, तेलंगणा, कर्नाटक आणि रायलसीमा या भागांमध्ये उष्णेतेच्या लाटेची ४ मे रोजी शक्यता आहे. याचबरोबर ३ मे रोजी कर्नाटक, कराईकल आणि पुद्दुचेरी यांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा:

प्रत्येक बापानं दमणाऱ्या बापाला भटकती आत्मा म्हणणाऱ्याला… Jitendra Awhad यांची आक्रमक भूमिका

”या’ प्रसिद्ध अभिनेत्रीने पण केला राजकारणात प्रवेश

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss