Sunday, May 19, 2024

Latest Posts

‘नायक’ चित्रपटाप्रमाणे मनोज जरांगे यांना मुख्यमंत्री करा, नंदरकर यांची मागणी

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे हे चर्चेत आहेत.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे हे चर्चेत आहेत. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी त्यांनी दोनदा उपोषण केलं. त्यानंतर त्यांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावी अशी मागणी केली आहे. त्यांना मराठा समाजाकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. परंतु त्याच्यामुळे राज्य सरकारची कोंडी झाली आहे. मराठा समाजास आरक्षण दिले तर ओबीसी समाज नाराज आणि दिले नाही तर मराठा नाराज सध्या राज्यात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या प्रश्नावर संभाजी नगरमधील रिक्षा चालक विशाल नंदरकर यांनी तोडगा काढला आहे. ३८ वर्षीय नंदरकर यांनी एका स्टँपपेपरवर आपली मागणी लिहिली आहे. त्यांनी त्यात असे लिहिले आहे कि मनोज जरांगे याना एका महिन्यासाठी मुख्यमंत्री बनवण्यात यावे, अशी मागणी केली आहे.

शिवबा संघटनेचे नेते मनोज जरांगे पाटील यांना एका महिन्यासाठी नायक चित्रपटाप्रमाणे मुख्यमंत्री करा, त्यानंतर अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारा मराठा आरक्षणाचा विषय सुटण्याची शक्यता आहे. मनोज जरांगे यांना मुख्यमंत्री केल्यावर त्यांच्याकडे फक्त मराठा आरक्षण हा विषय द्यावा. मनोज जरांगे पाटील यांना मुख्यमंत्री करताना एकनाथ शिंदेही मुख्यमंत्री राहणार आहे. ज्या प्रमाणे राज्यात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार असे दोन उपमुख्यमंत्री केले, त्याप्रमाणे मनोज जरांगे आणि एकनाथ शिंदे असे दोन जण मुख्यमंत्री म्हणून राहणार आहे. कारण एकनाथ शिंदे यांच्याकडे राज्यातील अनेक प्रश्न आहे. यामुळे मराठा आरक्षण सोडवण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही.

नंदरकर यांनी म्हटले की, राज्यातील सर्व पक्षांशी चर्चा करुन दुसरा मुख्यमंत्री नेमला पाहिजे. मनोज जरांगे यांना मुख्यमंत्री करताना मराठा, धनगर, मुस्लिम आणि ओबीसी हे आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याचे काम दिले पाहिजे. मनोज जरांगे हे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे ऐकतात. त्यामुळे मुख्यमंत्री असताना त्यांना त्यांची चांगली मदत होणार आहे. नंदरकर यांनी हे निवेदन छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. नंदरकर यांनी विधानसभा आणि लोकसभेची निवडणूक लढवली होती. ते ती पराभूत झाले होते.

हे ही वाचा:

ICC ने T20 World Cup 2024 साठी लाँच केला नवीन लोगो

Revanth Reddy बनले तेलंगणाचे तिसरे मुख्यमंत्री, तर मल्लू भाटी यांनी घेतली उपमुख्यमंत्री म्हणून शपथ

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss