मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे जीवाचे रान केले आहे. आरक्षण मिळत नाही तोपर्यंत घराच्या उंबऱ्यावर पाय ठेवायचा नाही, असे मनोज जरांगे यांनी ठरवले होते. मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे यांनी केलेल्या मागण्या मान्य केल्या आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मनोज जरांगेंना अध्यादेश सुपूर्द करण्यात आला आहे. त्यांनी राज्यातील प्रत्येक गावात जल्लोष सुरु झाला. मुंबईमध्ये आरक्षणाचा जल्लोष केल्यानंतर मनोज जरांगे काल रात्री अंतरवाली सराटी गावात दाखल झाले. स्वतःच्या घरी जाण्याची उत्सुकता असतानाच जरांगे यांनी आज दुपारी बारा वाजता गावकरी आणि गोदा पट्ट्यातील प्रमुख आंदोलकांची बैठक आयोजित केली आहे. आज अंतरवाली सराटी गावात बैठक होणार आहे.
मराठा आरक्षणाच्या विजयी सभेचे मनोज जरांगे यांनी आयोजन केले आहे. या सभेसाठी गोदा पट्ट्यातील नागरिक आणि गावकरी येणार आहेत. आज बोलवण्यात आलेल्या बैठकीमध्ये काही महत्वपूर्ण निर्णय घेतले जाणार आहेत. विजयी सभा कुठे आयोजित करायची, कधी करायची या सगळ्यांवर चर्चा करण्यात येणार आहे. या बैठकीसाठी गोदा पट्ट्यातील प्रमुख मराठा आंदोलक उपस्थित राहणार आहेत. चर्चा पार पडल्यानंतर काही महत्वपूर्ण निर्णय घेतले जाणार आहेत. त्यामुळे आता या बैठकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
२० जानेवारीला मनोज जरांगे आणि लाखोंच्या संख्येने मराठा बांधव मुंबईच्या दिशेने निघाले होते. जरांगे मुंबईला निघाल्यानंतर सरकार कामाला लागले. मनोज जरांगे वाशीमध्ये पोह्चल्यानंतर त्यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आला. या यशामुळे सगळीकडे आनंद उत्सव साजरा केला जात आहे. पेडे वाटून, गुलालाची उधळन, फटाक्याची अतिषबाजी करत मिरवणूका काढण्यात आल्या. मनोज जरांगे हे त्यांच्या जन्मभूमीमध्ये पोह्चल्यानंतर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. विशेष बाब म्हणजे मनोज जरांगे रात्री उशिरा अंतरवाली सराटीमध्ये पोहचले. त्यानंतर तिथे त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.
हे ही वाचा:
अंतरवाली सराटी गावात पोहचताच मनोज जरांगे यांनी भुजबळ, सदावर्तेवर केली टीका, म्हणाले….
ग्रॅन्ड फिनालेच्या आधी अमृता खानविलकरने बिग बॉसच्या घरात जाऊन घेतली अंकिता लोखंडेची भेट