Monday, May 20, 2024

Latest Posts

आंतरवली सराटीमध्ये मनोज जरांगेंची बैठक,बैठकीत पाटील पाटील घोषणा

राज्यभरात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा अजूनही चर्चेत आहेत.

राज्यभरात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा अजूनही चर्चेत आहेत. मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण द्यावे, अशी मागणी सरकारकडे केली आहे. तसेच सगेसोयऱ्यांच्या कायद्याची अंमलबजावणी करण्याची मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. यासाठी मनोज जरांगेंनी आंतरवली सराटीमध्ये बैठक बोलावली आहे. या बैठकीला सराटीमध्ये सुरुवात झाली आहे. जरांगेंनी बोलावलेल्या बैठकीला मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. सगळीकडे भगवं वादळ दिसत आहे. विशेष बाब म्हणजे मनोज जरांगे यांचे भाषणला उठल्यानंतर पाटील पाटील पाटील अश्या घोषणा देण्यात आल्या.

मनोज जरांगे म्हणाले, माझ्या आयुष्यातील ही सगळ्यात मोठी बैठक आहे. आमच्यावर गुन्हे दाखल केले जात होते. आमच्या ६ महिन्यापूर्वीचे गुन्हे दाखल केले जात आहेत. वेळी तुम्ही झोपले होते का?, एवढी नाराजी समाजाची घेण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गरज नव्हती. हे पाप तुम्ही कुठे फेडणार आहात, असे मनोज जरांगे म्हणाले.

यवतमाळमधील पोलीस महिलांना बसवून ठेवत आहेत. आंतरवली सराटीमध्ये जाऊ नये म्हणून त्यांना अडवले जात आहे. मात्र, मराठे नाही थांबणार, तुम्हाला घरी बसवतील. मी भावनेच्या आहारी बोलत नाही, राजकारण माझा मार्ग नाही. मी गोरगरीब मराठ्यांना मोठं करत असतो. मराठा समाजावर तुम्ही असा अन्याय करणार असाल, स्वतःच्या आई-बहिणी एवढी तुम्हाला इतरांच्या आई-बहिणीबाबत मया आली पाहिजे होती, असे म्हणत मनोज जरांगेंनी सरकारवर निशाणा साधला आहे.

हे ही वाचा:

महायुतीचे ४५ हून अधिक खासदार निवडून आणण्याचे Dr. Shikant Shinde यांचे लक्ष्य

अरविंद केजरीवाल तुरूंगातून सरकार चालवणार; पहिला आदेश जारी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss