Monday, April 29, 2024

Latest Posts

अरविंद केजरीवाल तुरूंगातून सरकार चालवणार; पहिला आदेश जारी

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Chief Minister Arvind Kejriwal) यांना ईडी कडून अटक करण्यात आली आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Chief Minister Arvind Kejriwal) यांना ईडी कडून अटक करण्यात आली आहे. त्यांना झालेल्या अटकेनंतर दिल्लीचं सरकार कोण आणि कसं चालवणार असा प्रश्न सगळ्यांचं पडला होता. मात्र या प्रश्नावर आता उत्तर मिळाले आहे. मुख्यमन्त्र अरविंद केजरीवाल यांनी तुरुंगातून पहिला आदेश जारी केला आहे. दिल्लीच्या जल मंत्रालयाशी संबंधित त्यांनी एक आदेश तुरुंगातून जारी केला आहे. अरविंद केजरीवाल यांच्यावर दिल्लीतील कथित अबकारी धोरण घोटाळ्याशी (Delhi Liquor Scam) संबंधित मनी लाँड्रिंगचा आरोप करून त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना २८ मार्चपर्यंत ईडीकडून कोठडी सुनावण्यात आली आहे.

ईडीकडून अरविंद केजरीवाल यांना अटक झाल्यानंतर सरकार कोण आणि कसं चालवणार असा प्रश्न सगळ्यांचं पडला होता. मात्र अरविंद केजरीवाल यांनी आज पहिला आदेश जारी केला आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी सरकार चालवावं, किंवा दिल्लीच्या मंत्री आणि केजरीवाल यांच्या विश्वासू आतिशी यांनी सरकार चालवावं, असे अनेक पर्याय सुचवण्यात आले होते.मात्र दिल्लीमधील सरकार हे तुरूंगातून सुद्धा अरविंद केजरीवाल हे चालवतील असे स्पष्ट करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांना अटक केली असता त्यांना तुरुंगातून सरकार चालवण्यावर कोणतेही निर्बंध नाहीत, तसा कोणताही कायदा अस्तित्वात नाही, त्यामुळे हा मार्ग आप कडून निवडण्यात आला आहे. केजरीवाल यांना अटक झाल्यानंतर पक्षाने आंदोलन सुरु केले आहे. त्यामुळे पोलिसांकडून कडक बंदोबस्त लावण्यात आला आहे. मध्य दिल्लीतील भाजप मुख्यालय आणि ईडी कार्यालयाकडे जाणारे सर्व रस्ते पोलिसांकडून बंद ठेवण्यात आले आहेत. शिवाय कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी दंगलविरोधी शस्त्रांनी सज्ज असलेले निमलष्करी दलाचे जवानही तैनात करण्यात आले आहेत.

अरविंद केजरीवाल यांना २१ मार्चला( शनिवार) रात्री अटक करण्यात आली. अटक केल्यानांतर केजरीवाल यांनी केलेल्या याचिकेत युक्तिवाद केला की आपली अटक आणि ताब्यात घेणे बेकायदेशीर आहे. पण कनिष्ठ न्यायालयाने त्यांना २८ मार्च पर्यंत ईडीकडून कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे तुरूंगातून दिल्लीचे सरकार चालवणार आहेत. आज त्यांनी तुरूंगातून पहिला आदेश जारी केला आहे.

हे ही वाचा:

मुरलीधर मोहोळ यांनी कुठल्या पैलवानला दूध पाजले? त्यांनी बिल्डर लोकांना दूध पाजले; रवींद्र धंगेकरांचा आरोप

बीडकरांचं प्रेम जनतेची सेवा करण्यासाठी ऊर्जा देणारं – Pankaja Munde

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss