Monday, April 29, 2024

Latest Posts

महायुतीचे ४५ हून अधिक खासदार निवडून आणण्याचे Dr. Shikant Shinde यांचे लक्ष्य

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघातील डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ येथे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांसमवेत आयोजित करण्यात आलेल्या संवाद मेळाव्यात शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी संबोधित केले.

विजय हा महायुतीचा आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला सर्वांना या निवडणुकीत महायुतीचे ४५ हून अधिक खासदार निवडून आणायचे आहेत. यासाठी सर्वांना एकत्रित काम करायचे आहे. महायुती सरकारच्या माध्यमातून आपल्या कल्याण लोकसभा मतदारसंघात पूर्णत्वास गेलेले अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प, कल्याणकारी योजना, आपल्या शहरात उभ्या राहिलेल्या पायाभूत सुविधा या सर्वांची माहिती नागरीकांपर्यंत पोहचवायची आहे, यासाठी सर्वांनी जोमाने काम करा असे यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आवाहन केले. तर येणाऱ्या दिवसात कल्याण लोकसभेतील महायुतीचे उमेदवार खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून येतील यासाठी सर्वांनी काम करायला हवे, असे आवाहन भाजपचे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांना केले. तसेच विजय हा महायुतीचा आहे. यासाठी आपल्या सर्वांना काम करायचे आहे. असेही यावेळी त्यांनी आवर्जून सांगितले.

पैसे देऊन माणसं आणावी लागली तरीही सभेचे मैदान रिकामंच

काही दिवसांपूर्वी नरेश म्हस्के यांनी ठाण्यात प्रकारांशी संवाद साधला होता. त्यावेळी महाविकास आघाडीच्या मुद्द्यावर नरेश म्हस्के म्हणाले होते की, पैसे देऊन माणसं आणावी लागली तरीही सभेचे मैदान रिकामं  होतं. आमचे वरिष्ठ नेते चर्चा करतील तेव्हा बैठक होईल, असेही नरेश म्हस्के यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्र  नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे महायुतीत जाण्याची चर्चा सुरु असतांना त्यांनी दिल्लीत अमित शाह यांची भेट घेतली. याबद्दल नरेश म्हस्के म्हणाले होते की, राज ठाकरे यांचं महायुतीत स्वागत असेल. जर असं झालं तर मला खूप आनंद होईल. राज ठाकरे महायुतीत आले तर मला पुन्हा त्यांच्यासोबत काम करायला मिळेल, असा आशावाद नरेश म्हस्के यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला होता.

हे ही वाचा:

उद्धव ठाकरेंकडून अभिषेक घोसाळकरांच्या पत्नीला लोकसभेचे तिकीट मिळण्याची शक्यता

मराठवाड्यात शिंदेंच्या शिवसेनेला एकच जागा मिळणार, संभाजीनगरची जागा भाजपाकडे जाण्याची शक्यता

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss