Tuesday, April 16, 2024

Latest Posts

Manoj Jarange Patil मोठ्या आंदोलनाच्या तयारीत, लग्नाचे मुहूर्त टाळा, वेळा बदला…

सध्या राज्यात मराठा आरक्षणावरून राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं चित्र दिसून येत आहे. मंगळवार, दिनांक २० फेब्रुवारी रोजी मराठा आरक्षणासंदर्भात असलेले विधयक हे विशेष अधिवेशनामध्ये समंत झाले.

सध्या राज्यात मराठा आरक्षणावरून राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं चित्र दिसून येत आहे. मंगळवार, दिनांक २० फेब्रुवारी रोजी मराठा आरक्षणासंदर्भात असलेले विधयक हे विशेष अधिवेशनामध्ये समंत झाले. त्यानंतर बुधवारी मनोज जरांगे-पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन पुढील भूमिका जाहीर केली. तर आज पुन्हा एकदा मनोज जरांगे यांनी अनेक गोष्टी मांडल्या आहेत.

मनोज जरांगे-पाटील हे मोठ्या आंदोलनाच्या तयारीत असल्याचं एकंदरीत चित्र दिसून येत आहे. सगे-सोयरे कायद्याच्या अंमलबजावणीसाठी मनोज जरांगे-पाटील २४ फेब्रुवारीपासून मोठे आंदोलन सुरु करणार आहेत. आता हे आंदोलन गावा-गावात असणार आहे. प्रत्येक गावात रास्ता रोको आंदोलन होणार आहे. त्यानंतर २९ फेब्रुवारीपासून मराठा समाजातील वृद्ध व्यक्ती उपोषणाला बसणार आहेत.

आजपासून ३ मार्चच्या रास्ता रोको आंदोलनाची तयारी सुरु करा. या दिवशीचा रास्ता रोको आंदोलन असा करा की, संपूर्ण देशात असे आंदोलन झाले नसेल. या दिवशी एकाच वेळी, एकाच ठिकाणी राज्यभरात रास्ता रोको आंदोलन करायचे आहे, असे मनोज जरांगे-पाटील यांनी म्हटले आहे. यावेळी बोलत असताना जरांगे म्हणाले की, ३ मार्च रोजी राज्यातील सर्वात मोठे रास्ता रोको आंदोलन होणार आहे. तर ३ मार्च हा लग्नाचा मुहूर्त मोठ्या प्रमाणावर आहे. या दिवशी दुपारी आणि संध्याकाळी लग्नाचे मुहूर्त आहेत. या दिवशी दुपारी असणारी लग्न संध्याकाळी लावावी. कारण, या दिवशी सर्वात मोठा रास्तो रोको आंदोलन निश्चित करण्यात आला आहे.

या दिवशी सकाळी लग्न लावू नका, सकाळच्या वेळी असणारे लग्न संध्याकाळी करा, असा सल्ला मनोज जरांगे-पाटील यांनी दिला आहे.जरांगे यांनी दिलेल्या सल्ल्यामुळे लग्न करणाऱ्यांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. यामुळे या दिवशी मराठा समाजासह इतर समाजातील लोकांनीही दुपारी आयोजित केलेले लग्न संध्याकाळी करावे. या दिवशी सर्व जण रास्ता रोको आंदोलनात सहभागी होतील. रास्ता रोको आंदोलनात नवरदेव-नवरी देखील सहभागी होतील, असे मनोज जरांगे-पाटील यांनी सांगितले.

हे ही वाचा:

 भोपळ्याच्या बिया पुरुषांसाठी ठरतात गुणकारी,जाणुन घ्या फायदे

‘त्यांचं’ निधन ही सांस्कृतिक क्षेत्राची कधीही भरुन न निघणारी हानी- Ajit Pawar

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss