Monday, May 20, 2024

Latest Posts

सरकारकडून देण्यात आलेल्या निर्णयावर मनोज जरांगे यांनी दिली प्रतिक्रिया

मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आज राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलावले आहे.

मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आज राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलावले आहे. या अधिवेशनामध्ये मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावर बोलताना मनोज जरांगे म्हणाले, करोडो मराठ्यांनी ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी केली. जे आरक्षण आम्हाला हवं आहे ते आम्ही मिळवणारच. आज सरकारने दिलेल्या आरक्षणाला आमचा विरोध नाही. पण ते न्यायालयात टिकले का? हा प्रश्न आहेच. त्यामुळे आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण ओबीसींमधून हवं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेवला म्हणून आमचे हे आंदोलन सहा महिने टिकलं. त्यामुळे आता मनोज जरांगे यांना ओबीसीमधून आरक्षण हवे आहे या निर्णयावर ते ठाम आहेत.

यावेळी बोलताना मनोज जरांगे म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्यावर विश्वास ठेवला म्हणून त्यांना ६ महिन्यांचा वेळ दिला होता. प्रत्येकवेळी आम्ही भावनांच्या आहारी जाऊन आमच्या मुलाबाळांचे नुकसान करणार नाही. आमच्या हक्काचं आरक्षण आम्हाला मिळालं पाहिजे. हरकतीचा विषय करून एवढ्या मोठ्या समाजाचा अपमान करायचा हे बरोबर नाही. आम्ही वेळ दिला, संयम ठेवला, हरकतीसाठी तुमच्याकडे यंत्रणा आहे. उद्या आंतरवली सराटीमध्ये १२ वाजता निर्णायक बैठक होणार आहे, या बैठकीनंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाणार आहे, असे मनोज जरांगे म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आजपर्यंत विश्वास ठेवला. आज देण्यात आलेले आरक्षण हे निवडणुकीपर्यंत टिकेल आणि उद्या जर उडाले तर बोंबलत बसायचं का?, आम्हाला त्या लफड्यामध्ये पडायचं नाही. सरकारचे आरक्षण टिकेल की नाही माहित नाही. सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी करावी, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे.

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सगेसोयरे अध्यादेशाची अमंलबजावणी करण्याची मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. या मागणीसाठी मनोज जरांगे मागील काही दिवसांपासून आंतरवलीमध्ये उपोषणासाठी बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा ११ वा दिवस आहे. उपोषणाला बसल्यानंतर मनोज जरांगे यांच्या शरीरात एकही अन्नाचा कण नसल्याने त्यांची प्रकृती खालावली होती. मात्र आज बोलावण्यात आलेल्या अधिवेशनात सगेसोयरेबाबत कोणताही निर्णय न झाल्याने त्यांनी पुन्हा एकदा उपचार घेणं बंद केले आहे. त्यांनी सलाई काढून फेकून दिली आहे.

हे ही वाचा:

Exclusive : ‘स्ट्रॉबेरी विथ सीएम’ कार्यक्रमात शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांवर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, स्ट्रॉबेरीपासून वाईन निर्मितीचा प्रकल्प…

अनुपमा मालिकेतील अभिनेते ऋतुराज सिंह यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss