Monday, May 20, 2024

Latest Posts

Exclusive : ‘स्ट्रॉबेरी विथ सीएम’ कार्यक्रमात शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांवर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, स्ट्रॉबेरीपासून वाईन निर्मितीचा प्रकल्प…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याची मुलाखत टाईम महाराष्ट्रचे मुख्य संपादक राजेश कोचरेकर यांनी घेतली. तसेच यावेळी मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांशी देखील संवाद साधला.

दिनांक १८ फेब्रुवारी २०२३ रोजी ‘टाईम महाराष्ट्र’ (Time Maharashtra) आयोजित पॅराग्लायडिंग प्री वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेचा बक्षीस समारंभ आणि स्ट्रॉबेरी विथ सीएम (Strawberry With CM) हा कार्यक्रम पाचगणी, सातारा येथील बिलिमोरिया हायस्कूल येथे पार पडला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ६० व्या वाढदिवसाचे औचित्य साधून ‘टाईम महाराष्ट्र’ (Time Maharashtra), महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि भारतीय पॅराग्लायडिंग असोसिएशन यांच्याकडून एका साहसी क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या संपूर्ण कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः उपस्थित होते.या पॅराग्लायडिंग प्री वर्ल्ड कप २०२४ या स्पर्धेचा बक्षीस समारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडणार आहे. तर या बक्षीस समारंभापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याची मुलाखत टाईम महाराष्ट्रचे मुख्य संपादक राजेश कोचरेकर यांनी घेतली. तसेच यावेळी मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांशी देखील संवाद साधला.

या कार्यक्रमादरम्यान ऑडिटोरियममध्ये उपस्थित असलेल्या सर्व शेतकऱ्यांना यावेळी चिठ्या देऊन स्थानिक शेतकऱ्यांच्या स्ट्रॉबेरी संदर्भातल्या समस्या लिहून घेतल्या होत्या. पुढे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते एक चिट्ठी काढून शेतकऱ्याच्या समस्यांचे निवारण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यावेळी विष्णू दगडू वाडकर रा. वाई, सातारा येथील शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरीला शासकीय अनुदान देण्यासंदर्भात प्रश्न हा चिठ्ठी मार्फत मांडला ,होता. यावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे म्हणाले होते कि, यावर नक्कीच विचार हा केला जाईल. तर या स्ट्रॉबेरी विथ सीएम कार्यक्रमाला आमदार, मंत्री, स्थानिक शेतकरी, महिलावर्ग यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग दर्शवला होता.तसेच महाबळेश्वर तालुक्यात मोठ्या प्रमाणात स्ट्रॉबेरी उत्पन्न घेतले जाते. या उत्पन्नावरच येथील शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी स्ट्रॉबेरी पिकाला शासन अनुदान देण्यासाठी शासन प्रयत्नशील असून याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याशी चर्चा केली जाईल, अशी ग्वाही यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

तसेच यावेळी बोलत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक मुद्दे मांडले आहेत. याचवेळी बोलतांना शिंदे म्हणाले की, “महाबळेश्वर व जावळी हे डोंगरी तालुके आहेत. येथील नागरिक कामासाठी मुंबई येथे जातात. ते पुन्हा गावात यावेत, नोकरीच्या शोधार्थ शहरात जाणाऱ्यांना स्थानिक पातळीवरच रोजगार उपलब्ध व्हावेत यासाठी पर्यटन वाढी बरोबर रोजगार निर्मितीवर भर देत आहोत. याबाबत बोलतांना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहेत की, शेतकऱ्यांनी आता पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड दिली पाहिजे. शेत पिकावर प्रक्रिया उद्योग उभारल्यास शेतकऱ्यांना त्याचा अधिक फायदा होईल. यादृष्टीने शेतीमध्ये गुंतवणूक वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. शेतीमधून आर्थिक उत्पन्न वाढावे म्हणून मागेल त्याला शेततळे, ठिबक सिंचन, एक रुपयात पीक विमा अशा अनेक योजना राज्य शासन राबवीत आहेत. त्याचबरोबर अतिवृष्टीत बाधित शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषापेक्षा दुपटीने आर्थिक मदत करण्याचा निर्णयही शासनाने घेतला. तसेच, स्ट्रॉबेरी पिकाला शासन अनुदान देण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली आहे. स्ट्रॉबेरीपासून वाईन निर्मितीचा प्रकल्पही महाबळेश्वर येथे उभारण्यात येईल, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.

या कार्यक्रमाला साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, आमदार मकरंद पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांच्यासह महाबळेश्वर तालुक्यातील स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हे ही वाचा: 

५० टक्क्यांच्या आत आरक्षण द्यायचे असेल तर वेगळा कायदा का? छगन भुजबळांचा सरकारला प्रश्न

Time Maharashtra आयोजित stawberry with cm कार्यक्रम एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पाचगणी येथे संपन्न

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss