Sunday, May 19, 2024

Latest Posts

शिंदे गटातील आमदार भरत गोगावले यांच्या गाडीचा अपघात

शिंदे गटातील बंडखोर आमदार भरत गोगावले यांच्या गाडीला अपघात झाल्याची माहिती समोर आली.

मुंबई : शिंदे गटातील बंडखोर आमदार भरत गोगावले यांच्या गाडीला अपघात झाल्याची माहिती समोर आली. मुंबईतील ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर आठ गाड्यांची धडक झाली असून या अपघातात कोणालाही दुखापत झालेली नाही.

आमदार भरत गोगावले यांनी एक व्हिडिओ करत या संपूर्ण घटनेची माहिती दिली त्यात ते म्हणाले “ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर एक टॅक्सी बंद पडली होती. तिच्याच मागोमाग एकूण आठ गाड्यांनी धडक दिली. आणि या गाड्यांचे नुकसान झाले परंतु या आठ गाड्यातील कोणत्याही व्यक्तीला दुखापत झालेली नाही. तुम्हा जनतेच्या आशीर्वादाने मी सुखरूप आहे”. अशी माहिती भरत गोगावले यांनी दिली.

हेही वाचा : 

शिंदे आणि शिंदे गटाला सुप्रीम कोर्टाचा दिलासा

Latest Posts

Don't Miss