spot_img
Sunday, December 15, 2024
spot_img

Latest Posts

आमदार रोहित पवारांची आज पुन्हा होणार ईडी चौकशी

लोकसभा निवडणूक तोंडावर आहे. त्यापाठोपाठ विधानसभा निवडणुका होणार आहेत. अशात विरोधी पक्षातील नेत्यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लागलेला दिसतोय.

लोकसभा निवडणूक तोंडावर आहे. त्यापाठोपाठ विधानसभा निवडणुका होणार आहेत. अशात विरोधी पक्षातील नेत्यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लागलेला दिसतोय. महाविकास आघाडीतील तीन नेत्यांची तपास यंत्रणांकडून चौकशी सुरु आहे. नुकतीच किशोरी पेढणेकर यांच्या चौकशीच्या बातम्या येत असतानाच आज पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांची ED चौकशी ही होणार आहे. बारामती ॲग्रो कारखाना प्रकरणी आज रोहित पवार ईडीच्या रडारवर आहे. मागील आठवड्यात दिनांक २४ जानेवारी रोजी रोहित पवार यांची चौकशी ही करण्यात आली होती आणि ही चौकशी तब्बल ११ तास चालू होती.

दिनांक २४ जानेवारी २०२४ रोजी, ईडी ने बारामती ऍग्रो प्रायव्हेट लिमिटेड मार्फत कन्नड एसएसके औरंगाबाद या बंद साखर कारखान्याच्या खरेदीशी संबंधित रोहित पवार यांची ११ तास चौकशी केली आणि आता त्यांना पुन्हा एकदा आज दिनांक १ फेब्रुवारी रोजी समन्स बजावले आहेत . पण एका केस संदर्भात दोन तपास यंत्रणांच्या चौकशीची दिशा वेगळी असल्याने कोणाचा तपास योग्य असा सवाल उपस्थित होत आहे. २५ हजार कोटींच्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँकघोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने आमदार रोहित पवारांची तब्बल ११ तास चौकशी केली. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणात दाखल केलेल्या गुन्हाच्या आधारेच ईडीने ईसीआयआर दाखल करुन चौकशीला सुरुवात केली.

हे प्रकरण आहे २०१९ सालाचं. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, पोलिसांनी अज्ञात माजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री आणि बँक संचालकांविरुद्ध 25,000 कोटी रुपयांचे नुकसान केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. प्रकरण नंतर EOW कडे वर्ग करण्यात आले. पण सत्ता परिवर्तन झालं आणि राज्यात महाविकास आघाडी सरकार आलं. त्यांनतर मुंबई पोलिसांनी २०२० साली पहिला क्लोजर अहवाल सादर करत अजित पवार आणि इतर नेत्यांना क्लिनचिट दिली. पण नंतर, २०२२ मध्ये महायुतीच सरकार आलं आणि पोलिसांनी केस पुन्हा उघडण्यासाठी अर्ज दाखल केला.

Latest Posts

Don't Miss