मुंबईतील कांदिवलीमध्ये एका चार वर्षीय मुलीवर शाळेमध्ये अत्याचार करण्यात आला आहे. कांदिवलीमध्ये घडलेली ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना आहे. कांदिवली (Kandivli) पूर्व समता नगरमध्ये राहणाऱ्या एका चार वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे सगळीकडे संताप व्यक्त केला जात आहे. शाळेतील कर्मचाऱ्याने विद्यार्थीनीसोबत हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. या नराधमाने शाळेमध्येच मुलीवर अत्याचार केला आहे.
कांदिवली अशोक नगरमध्ये असलेल्या लिटल कॅप्टन प्री स्कूलमध्ये चार वर्षीय मुलगी शिकत होती. २ फेब्रुवारीला मुलगी नेहमीप्रमाणे तिच्या वडिलांसोबत शाळेत गेली होती. मुलगी शाळेतून घरी परत आल्यानंतर तिच्या पोटाला दुखापत झाल्याने तिला आईने विश्वासात घेऊन विचारपूस केली. विचारपूस केल्यानंतर चार वर्षीय मुलीने आईला घडलेला सर्व प्रकार सांगितला. मुलीने आईला सांगितले, शाळेतील काका बाथरूममध्ये घेऊन गेले. त्यानंतर त्यांनी चॉकलेटच्या बहाण्याने तिच्यावर अत्याचार केला. हा सर्व प्रकार आईला समजल्यानंतर तिला लगेच रुग्णालयात नेले, तिथे आता लहान मुलीवर उपचार सुरु आहेत. घडलेल्या या संपूर्ण प्रकरणी समता नगर पोलिसांनी लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक करून ताब्यात घेतले आहे. पुढील तपास आता सुरु आहे.
मुंबईसारख्या मोठ्या शहरात भर दिवसा अत्याचारच्या घटना घडत आहे. चार वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याने सगळीकडे संताप व्यक्त केला जात आहे. या चार वर्षीय मुलीला शाळेतील एका कर्मचाऱ्याने चॉकलेटच्या बहाण्याने बाथरूममध्ये नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यामुळे आता मुली शाळेत सुरक्षित आहेत कि नाही? यावर प्रश्न उपस्थित राहिला आहे.
हे ही वाचा:
बॉलीवूड अभिनेत्यासोबत पूजा सांवतचा जलवा, ‘क्रॅक’ या सिनेमातील गाणं प्रदर्शित
नागपूरमध्ये बनावट नोटा देऊन लाखो रुपयांचे दागिने लुटले, दिल्लीतून आरोपींना अटक