Tuesday, April 16, 2024

Latest Posts

नागपूरमध्ये बनावट नोटा देऊन लाखो रुपयांचे दागिने लुटले, दिल्लीतून आरोपींना अटक

नागपूरमध्ये पाच लाख रुपयांच्या बनावट नोटा देऊन एका महिलेचे लाखो रुपयांचे दागिने चोरांनी लंपास केले आहेत.

नागपूरमध्ये पाच लाख रुपयांच्या बनावट नोटा देऊन एका महिलेचे लाखो रुपयांचे दागिने चोरांनी लंपास केले आहेत. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या युनिटने तिघांना अटक केली आहे. आरोपींनी महिलेला भावनिक साद घालत २ लाख १० हजार रुपये किमतीचे दागिने घेऊन आरोपी पळून गेले आहेत. विशेष बाब म्हणजे हा सर्व प्रकार उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नागपूरमधील घराजवळ घडली आहे. त्यानंतर या संपूर्ण प्रकारचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी आरोपींवर कारवाई केली आहे.

बनावट नोटांचा गंडा घालत तीन आरोपींनी एका महिलेला लुटले आहे. संजय रामलाल सोलंकी, गोविंद उकाराम राठोड अशी आरोपींची नावे आहेत. गिरीपेठमध्ये राहणाऱ्या रहिवासी दमयंती समशेर बहादुर सिंग या १८ जानेवारीला सायंकाळी साडे सहा वाजताच्या दरम्यान कुकर दुरुस्तीसाठी घराबाहेर निघाल्या होत्या. त्यानंतर त्यांना वाटेमध्ये दोन अनोळखी व्यक्ती भेटले. दोन अनोळखी व्यक्तींनी दमयंती यांना विश्वासात घेतले. आम्ही गरीब आहोत आमची मदत करा असे सांगत ते दमयंती यांना भोजनालयाकडे घेऊन गेले. नंतर दोघांनी दमयंती यांच्या पिशवीमध्ये ५ लाख रुपयांच्या नोटा ठेवल्या आणि त्यांना सांगितले तुमच्या अंगावरील दागिने काढून ठेवा. त्यांच्या सांगण्यावरून दमयंती यांनी हातातल्या बांगड्या आणि सोन्याचे लॉकेट असा एकूण २ लाख २० हजार रुपये किमतीचा सर्व मुद्देमाल काढून पिशवीत ठेवला. आरोपींनी दागिने पिशवीमध्ये ठेवले आहे असे भासवत त्यांनी तिथून पळ काढला. त्यानंतर दमयंती यांनी पॉलिथीनमधील पैशांचे बंडल तपासले, त्या पिशवीमध्ये वरच्या बाजूला ५०० रुपयांची नोट आणि खालच्या बाजूला कोरे कागद होते हे त्यांच्या लक्षात आले.

दमयंती यांना हा सर्व प्रकार समजल्यानंतर त्यांना धक्का बसला. लगेच त्यांनी त्या अनोळखी व्यक्तींना शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र ते दोघंही घटना स्थळावरून पळून गेले. आपली फसवणूक झाली आहे गोष्ट लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. दमयंती यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. परिसरातील सीसीटिव्ही कॅमेरामधील फुटेज पोलिसांनी तपासून पहिले आहेत. नंतर पोलिसांच्या युनिटने लोकेशनवर सापळा रचून आरोपींना दिल्लीमधून अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून दोन सोन्याच्या बांगड्या, लॉकेट, दोन मोबाइल आणि रोख ४९ हजार असा एकूण २ लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

हे ही वाचा: 

बॉलीवूड अभिनेत्यासोबत पूजा सांवतचा जलवा, ‘क्रॅक’ या सिनेमातील गाणं प्रदर्शित

शांत न बसल्यास त्यांच्या पक्षासह त्यांच्या नेत्यांची नावे उघड करणार: मनोज जरांगेंचा थेट इशारा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss