Saturday, March 2, 2024

Latest Posts

मुंबईतील शताब्दी रुग्णालयात घडला धक्कादायक प्रकार, महिलेचा बाथरुममध्ये व्हिडिओ काढण्याचा केला प्रयत्न

मुंबईतील(Mumbai) शताब्दी रुग्णालयात (Shatabdi Hospital)एक धक्कादायक प्रकार घडला आहे.

मुंबईतील(Mumbai) शताब्दी रुग्णालयात (Shatabdi Hospital)एक धक्कादायक प्रकार घडला आहे. रुग्णालयातील एका सफाई कर्मचाऱ्याने बाथरूममधून महिलेचा व्हिडिओ रेकॉर्ड केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपीला गोवंडी पोलिसांनी अटक केली आहे. तसेच नोंदवण्यात आलेल्या तक्ररीनुसार पोलिसांनी आरोपीवर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा नोंदवून पुढील तपास करण्यास सुरुवात केली आहे. अशोक गुप्ता असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

शताब्दी रुग्णालयातील ही घटना २ डिसेंबर शनिवारी घडली. महाविद्यालयातील एका विद्यार्थिनीचा बाथरुमध्ये डोकावून व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याचा प्रयत्न केला. मुंबई पोलीसांनी या प्रकरणी आरोपीला अटक केली आहे. महाविद्यायातील २७ वर्षीय मुलगी एका कॉन्फरन्ससाठी गेली होती. त्यानंतर ती फ्रेश होण्यासाठी वसतिगृहामध्ये गेली. या वसतीगृहात महिला आणि पुरुषांचे आजूबाजूला स्नानगृह आहे असे एका अधिकाऱ्याने सांगितले. फ्रेश होण्यासाठी गेल्यानंतर एका सफाई कर्मचाऱ्याने तिचा व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला. ती महिला अंघोळी करत असताना तिचा एका रोजंदारी कर्मचाऱ्याने भिंतींवर चढून तिचा व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला. आरोपीला मुलीचा व्हिडिओ काढत असल्याचे समजताच तिने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तो तिथून पळून गेला.

शताब्दी रुग्णालयातील या घटनेमुळे सगळीकडे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यानंतर मुलीने लगेच पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला. तक्रार केल्यानंतर पोलिसांनी लगेच आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. सध्या अटक करण्यात आलेल्या आरोपीला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. या तपासादरम्यान आणखी काही गोष्टी उघड होतील का हे पाहणं महत्वाचे असणार आहे.

हे ही वाचा:

जितेंद्र आव्हाडांच्या टीकेला अजित पवार गटाच्या नेत्याने दिल प्रत्युत्तर

‘नायक’ चित्रपटाप्रमाणे मनोज जरांगे यांना मुख्यमंत्री करा, नंदरकर यांची मागणी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss