Wednesday, May 15, 2024

Latest Posts

अनिल परबांचा किरीट सोमय्यांवर खोचक टोला, सोमय्या म्हाडाचा मुकादम आहे का?

सध्या महाराष्ट्राच राजकारण चांगलाच तापल्याच दिसून येत आहे. तर आज ठाकरे गटाचे नेते आणि आमदार अनिल परब (Anil Parab) यांच्या वांद्रे येथील म्हाडा कॉलनमधील अनधिकृत कार्यालय (Unauthorized office) तोडल्याचा दावा केला होता. त्यासंदर्भात अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपा नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somayya) यांच्यावर जोरदार हल्लबोल केला आहे. किरीट सोमय्या म्हाडाचा मुकादम आहे का? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

पुढे अनिल परब म्हणाले, ही इमारत १९६० मध्ये बांधण्यात आली. माझा जन्म याच इमारतीत झाला. या इमारतीत मी लहानाचा मोठा झालो. मी जेव्हा आमदार झालो तेव्हा या इमारती या आता मालकीच्या झाल्या म्हाडाकडे राहिल्या नाहीत असं मला इमारतीच्या लोकांनीच सांगितलं. माझं कार्यालय इथेच होतं. अनेक वर्षे ही जागा मी वापरत होतो. मी जेव्हा मंत्री झालो तेव्हा किरीट सोमय्यांनी म्हाडा, लोकायुक्त यांच्याकडे जाऊन माझं अनधिकृत कार्यालय आहे हे भासवून मला नोटीस द्यायला लावली असं अनिल परब यांनी सांगितलं. किरीट सोमय्याने बिल्डर्सकडून सुपारी घेतली आहे असाही आरोप अनिल परब यांनी केला आहे.

नोटीसला उत्तर देताना सांगितलं की सदर जागा माझी नाही तर सोसायटीची आहे. त्यानंतर मला पाठवण्यात आलेली नोटीस म्हाडाने मागे घेतली. यानंतर इमारतीतले रहिवासी कोर्टात गेले. त्यांनी सांगितलं की रेग्युलरायझेशनसाठी (Regularization) तुम्ही अर्ज केला. तसा अर्ज करण्यात आला. आम्ही म्हाडाला हे सांगितलं. म्हाडाने हे रेग्युलराईज करता येणार नाही सांगितलं. किरीट सोमय्यांनी त्यांच्यावर दबाव टाकला होता. त्यानंतर या जागा इमारतीने स्वतःहून मोकळ्या केल्या. गरीब मराठी माणूस या विभागात राहतो. त्यांची ही जागा आहे. ही जागा सोसायटीची आहे. म्हाडाच्या ५६ वसाहती आहेत ज्या पुनर्विकासाच्या मार्गावर आहेत. त्यात अशा प्रकारची ऑर्डर येणं आणि लोकांना मूळ घरं २२० स्क्वेअर फूटचीच घरं द्यायची या हेतून किरीट सोमय्यांना बिल्डर्संकडून सुपारी घेतली असावी असाही आरोप अनिल परब यांनी केला.

हे ही वाचा:

Budget 2023 , ‘भारत प्रथम, नागरिक प्रथम’ हा विचार घेऊन अर्थसंकल्पीय अधिवेशन पुढे नेणार, नरेंद्र मोदी

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर कार आणि बसचा भीषण अपघात

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss