Saturday, July 27, 2024

Latest Posts

भाजपने लालकृष्ण अडवाणींना राष्ट्रपती करायला हवं, संजय राऊत

लालकृष्ण आडवाणी यांचे फोन करुन अभिनंदन केले आहे. लालकृष्ण आडवाणी यांना जाहीर करण्यात आलेल्या पुरस्कारांवर आज सकाळी संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. तसेच छगन भुजबळ यांच्या वक्तव्यांवर देखील राऊतांनी भाष्य केले आहे.

काल दिनांक ३ फेब्रुवारी रोजी लालकृष्ण आडवाणी यांना देशाच्या सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न (Bharat Ratna to LK Advani) जाहीर करण्यात आला आहे. खुद्द भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी स्वतः ट्विट करत या संदर्भाची बातमी ही दिली आहे. तसेच लालकृष्ण आडवाणी यांचे फोन करुन अभिनंदन केले आहे. लालकृष्ण आडवाणी यांना जाहीर करण्यात आलेल्या पुरस्कारांवर आज सकाळी संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. तसेच छगन भुजबळ यांच्या वक्तव्यांवर देखील राऊतांनी भाष्य केले आहे.

आज सकाळी संजय राऊत हे मुंबईमध्ये माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलत असताना ते म्हणाले आहेत की, अडवाणी यांना भारतरत्न दिल्याबद्दल आम्हाला आनंद आहे. आम्ही त्यांचे स्वागत करतो. अडवाणी यांच्याबरोबर हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे , वीर सावरकर, स्वातंत्र्यवीर सावरकर याची मागणी आम्ही केली होती. आपली राजकीय सोय पाहण्यासाठी सरकार पदव्यांची खिरापत वाढवते. या वेळेचे पद्मश्री किंवा पद्म पुरस्कार मध्ये बहुसंख्य भारतीय जनता पक्षाची संबंधित लोक आहेत. किंवा संघ परिवार मधील लोक आहेत. लालकृष्णा अडवाणी यांचा देशाच्या राजकारणात स्वातंत्र्य लढ्यात सामाजिक कार्यात योगदान नक्की मोठंआहे. अडवाणी नसते त्यांनी राम रथ यात्रा आणि तो लढा सुरू केला नसता तर आता भारतीय जनता पक्ष तुम्हाला दिसला नसता. दोन खासदारांमध्ये होता तो आता ३०० पार झाला आहे. तो आडवाणी मुळे झाला आहे. अडवाणी यांनी सातत्याने अटल बिहारी वाजपेयी यांची पाठराखण केली. वारंवार त्यांनी आपकी बार अटल बिहारी ही घोषणा दिली त्यांची क्षमता असताना देखील. प्रधानमंत्री होण्याची त्यांची योग्यता आणि त्यांचा अधिकार असताना त्यांना दूर साधला गेला. आणि त्यांना इतका अडगळीत टाकला गेला की अडवाणींना विसरून गेले. मग त्यांना पद्मविभूषण पदवी द्या किंवा आता भारतरत्न द्या आज त्यांचा वय ९७ वर्ष आहे. यांना राष्ट्रपती पदाचा तरी सन्मान त्यांना द्यायला हवा असं कायम म्हणणं आहे . राजकारणातले विषम पुरुष त्यांना आपण सन्मानाने राष्ट्रपती पदी आणलं पाहिजे होते. त्यांना आणलं पाहिजे होतं ते केलं नाही आता भारतरत्न केलं आहे. ते आपल्या हातात आहे ठीक आहे आम्हाला आनंद आहे आम्ही स्वागत करतो असं राऊत म्हणाले आहेत.

तसेच छगन भुजबळ यांनी काल केलेल्या वक्तव्यांवर देखील राऊतांनी भाष्य केले आहे. यावेळी बोलत असताना राऊत म्हणाले आहेत की, मंत्री छगन भुजबळांचा राजीनामा म्हणजे केवळ नाटक आहे. राजीनामा देऊनही भुजबळ कॅबिनेट बैठकीत सहभागी झाले. त्यानंतर ते कॅबिनेट बैठकीत सामील झाले आहेत. छगन भुजबळ हे ओबीसी समाजाचा भूमिका मांडत आहेत. शिवसेनेची भूमिका स्पष्ट आहे कोणाच्या ताटातलं काढून दुसऱ्याला मिळू नये. मराठा समाजाच्या मागण्या आरक्षणच्या मागण्या होत्या. धनगर समाजाच्या मागण्या मान्य व्हाव्या, ओबीसी च्या ताटातलं ओढून कोणाला देऊ नये ही आमची भूमिका आहे. छगन भुजबळ यांनी देखील तीच भूमिका मांडली आहे. त्यासाठी या महाराष्ट्रामध्ये इतका टोकाचा जातीयवाद निर्माण करण्याची गरज नाही. महाराष्ट्र ज्या पद्धतीने जाती वादाच्या खाली ढकलला जात आहे, हे महाराष्ट्राच्या भविष्यासाठी चांगलं नाही. छगन भुजबळ यांनी घेतलेल्या भूमिका सरकार विरुद्ध आणि मुख्यमंत्री यांच्या विरोधी आहेत. जेव्हा मुख्यमंत्री यांच्या विरोधात कोणतरी भूमिका घेत तेव्हा त्याला मंत्री मंडळातून बरखास्त केलं जातं. ही आतापर्यंतची परंपरा आहे. बोलत आहेत की मी राजीनामा दिला आणि राजीनामा स्वीकारला नाही आणि त्यांचा राजीनामा स्वीकारण्याचा अधिकार हे मुख्यमंत्री यांना आहे की, फडणवीस यांना आहे स्पष्ट करावे लागेले.

हे ही वाचा:

हिवाळ्यात पायांच्या तळवे-टाचा होतात कडक,जाणुन घ्या घरच्या घरी डेट स्किन स्वच्छ करायच्या टिप्स

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्य घोटाळ्या प्रकरणी पाचव्यांदा ईडीचा समन्स

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss