Mumbai Municipal Corporation Budget 2024-2025 : काल दिनांक १ फेब्रुवारी २०२४ रोजी केंद्रीय बजेट हे सादर करण्यात आले आहे. केंद्रीय बजेट सादर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मुंबई महापालिकेचा (BMC Budget 2024) आगामी वर्षासाठीचा अर्थसंकल्प (Budget 2024-25) हा सादर केला जातो. त्यामुळे आता संपूर्ण मुंबईकरांचं लक्ष हे आज सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाकडे आहे. मुंबई महापालिकेची आगामी निवडणूक (BMC Elections) डोळ्यांसमोर ठेवून हा अर्थसंकल्प सादर होण्याची शक्यता सध्या मोठ्या प्रमाणात वर्तवली जात आहे.
आज संपूर्ण मुंबईकरांचे लक्ष हे मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पाकडे लागले आहे. मुंबई महापालिकेत निवडून आलेल्या नगरसेवकांची मुदत ७ मार्च २०२२ रोजी संपली होती. त्यानंतर गेल्या दीड वर्षांपासून बीएमसीच्या कारभाराचा गाडा आयुक्त आणि प्रशासक इक्बाल सिंह चहल यांच्याकडून हाकला जात आहे. गेल्या वर्षी पहिल्यांदाच प्रशासकांकडून अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. मुंबई महापालिकेची निवडणूक अजूनही झालेली नसल्यानं, यंदा सलग दुसर्या वर्षी प्रशासकच अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
मुंबई महापालिकेचं यंदा ‘इलेक्शन बजेट’, कोणत्या सुविधा मिळणार?
मुंबईकरांवरची करवाढ टळणार अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
‘बेस्ट’साठी तरतूद
ठेवी घटल्याने अंतर्गत कर्जाचा पर्याय
मोठ्या प्रकल्पांकरता निधी
पायाभूत सोयीसुविधांवर भर
बीएमसीची आर्थिक परिस्थिती हाताळण्याचं आव्हान
स्वच्छता आणि सुशोभिकरणावर विशेष लक्ष
मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात गेल्या वर्षीपेक्षा ३ हजार कोटींची वाढ अपेक्षित आहे. गेल्या वर्षीचा ५२ हजार ६१९ कोटींचा अर्थसंकल्प यंदा ५५ हजार कोटींवर जाण्याची शक्यता आहे. एकीकडे मुंबई महापालिकेच्या मुदत ठेवी ८ हजार कोटींनी घटल्या आहेत, तर दुसरीकडे उत्पन्नाचे नवे स्रोतही आटले आहेत. पण तरीही निवडणूक वर्ष डोळ्यांसमोर ठेऊन फुगीर अर्थसंकल्प सादर होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये नव्या योजनांची घोषणा होण्याची शक्यता कमी असली तरी, जुन्या योजना आणि प्रकल्पांसाठी भरीव तरतूद होण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा:
हिवाळ्यात पायांच्या तळवे-टाचा होतात कडक,जाणुन घ्या घरच्या घरी डेट स्किन स्वच्छ करायच्या टिप्स
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्य घोटाळ्या प्रकरणी पाचव्यांदा ईडीचा समन्स