Wednesday, February 28, 2024

Latest Posts

मराठी पाट्याप्रकरणी BMC आली ऍक्शन मोडमध्ये, १७६ दुकानांवर कारवाई

सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या निर्देशानुसार बृहन्‍मुंबई महानगरपालिका (BMC) कार्यक्षेत्रातील दुकाने आणि आस्थापनांवर मराठी देवनागरी लिपित, ठळक अक्षरात नामफलक (Marathi Patya) लावणे बंधनकारक आहे. या निर्देशांची अंमलबजावणी तपासणी करण्‍याकामी बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍या २४ प्रशासकीय विभागातील दुकाने आणि आस्थापना खात्याने केली. महापालिकेच्या पथकाने आज ३ हजार २६९ दुकाने आणि आस्थापनांना भेटी दिल्‍या. तसेच मराठी नामफलकांची तपासणी केली. या तपासणीत मराठी देवनागरी लिपित ठळक अक्षरात ३ हजार ९३ नामफलक आढळले. तर सर्वोच्च न्यायालयाचे तसेच कायद्यातील निर्देश या आधारे अनुपालन नसलेल्या १७६ दुकाने व आस्थापनांवर नियमाधीन कारवाई करण्यात आली.

मुंबईतील सर्व दुकाने आणि आस्थापना यांच्यावर मराठी भाषेत, देवनागरी लिपीत, ठळक अशा प्रकारचे नामफलक लावण्याच्या दृष्टीने बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी व्यापक बैठक घेऊन माननीय सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या निर्देशाचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश सर्व संबंधितांना दिले आहेत. महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) नियम, २०१८ व महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) (सुधारणा) अधिनियम, २०२२ च्या अनुक्रमे नियम ३५ व कलम ३६ क च्या तरतुदींनुसार आस्थापनांचे नामफलक मराठी देवनागरी लिपित, ठळक अक्षरात असणे बंधनकारक आहे. सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेनुसार, दुकाने व आस्थापनांचे नामफलक मराठी देवनागरी लिपित ठळक अक्षरात लावण्याबाबत दोन महिन्यांची मुदत दिली होती. ही मुदत शुक्रवार दिनांक २५ नोव्‍हेंबर २०२३ रोजी संपुष्टात आली. साप्ताहिक आणि सार्वजनिक सुटी असल्याने नामफलकाबाबतची तपासणी कारवाई मंगळवार, दिनांक २५ नोव्‍हेंबर २०२३ पासून सुरु करण्यात आली आहे.

त्यानुसार अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (शहर) डॉ. अश्विनी जोशी आणि उप आयुक्‍त (विशेष) संजोग कबरे यांच्‍या मार्गदर्शनाखाली सदर कारवाईकरीता २४ विभाग स्तरावर दुकाने व आस्थापना खात्यातील वरिष्‍ठ सुविधाकार व सुविधाकारांचे पथक गठीत करण्यात आले आहे. त्‍यांना कारवाईचे अधिकार देण्‍यात आले आहेत. विभाग स्तरीय दुकाने व आस्थापना खात्यातील वरिष्‍ठ सुविधाकार व सुविधाकारांच्‍या पथकांनी आज एकाच दिवशी २ हजार २६९ दुकाने व आस्थापनांना भेटी दिल्‍या. तसेच, मराठी नामफलकांची तपासणी केली. या तपासणीत मराठी देवनागरी लिपित, ठळक अक्षरात ३ हजार ९३ नामफलक आढळले. तसेच, १७६ दुकाने व आस्थापनांनी अधिनियमांची तरतूद व माननीय सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश यानुसार नामफलक मराठी भाषेत देवनागरी लिपित ठळक अक्षरात लावले नसल्याने अशी दुकाने व आस्थापनांवर अधिनियमातील तरतुदीनुसार न्यायालयीन कार्यवाही करण्यात आली, असे महानगरपालिकेच्‍या वतीने कळविण्‍यात येत आहे.

हे ही वाचा:

कोरडवाहूला एकरी २५ हजार तर बागायतीला एकरी ५० हजार रुपयांची तात्काळ मदत द्या, नाना पटोलेंचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र

पूजा सावंतला मिळाला तिच्या आयुष्याचा जोडीदार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss