Saturday, March 2, 2024

Latest Posts

चुनाभट्टीतील स्थानिक गुंड पप्पू येरुणकरवर दिवसाढवळ्या गोळीबार

मुंबईमधील चुनाभट्टी परिसरातील स्थानिक गुंड पप्पू येरुणकरवर (Pappu Yerunkar) याच्यावर गोळीबार करण्यात आला आहे.

मुंबईमधील चुनाभट्टी परिसरातील स्थानिक गुंड पप्पू येरुणकरवर (Pappu Yerunkar) याच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. अंतर्गत झालेल्या वादामुळे त्याच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. तसेच त्याचसोबत असलेल्या तीन ते चार लोकांवर देखील गोळीबार करण्यात आला आहे. या गोळीबारात जखमी झालेल्याना सायन रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

चुनाभट्टीतील आझाद गल्ली परिसरात आज दुपारी साडेतीनच्या सुमारास ही सर्व घटना घडली. या गोळीबारात १६ राऊंड फायर करण्यात आले. येरुणकर आणि त्याचं सोबत असलेल्या तिघांची प्रकृती गंभीर आहे. या संपूर्ण परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त लावण्यात आला आहे. पप्पू येरुणकर हा चुनाभट्टी परिसरातील स्थानक गुंड आहे. त्याच्यावर अंतर्गत वादातून गोळीबार करण्यात आला आहे. गोळीबार का करण्यात आला याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. पप्पू येरुणकरवर अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत तसेच तो या आधी तुरुंगात जाऊन आला आहे. त्याचे अनेक लोकांसोबत काही जुने वाद देखील आहेत. त्यातूनच त्याच्यावर हल्ला करण्यात आल्याचा अंदाज वर्तवला आहे. ज्या परिसरात हल्ला झाला तो भाग नेहमी गजबजलेला असतो. या परिसरात अनेक दुकान आहेत. या घटनेचा सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलीस अधिक तपास करत आहेत. मात्र दिवसा घडलेल्या घटनेमुळे सगळीकडे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हे ही वाचा:

बोनी कपूर आणि लेक जान्हवी कपूर यांनी विकली तब्बल चार फ्लॅट

THANE: भिवंडीत फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन व फन अँड फूड फेस्टिवल साजरा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss