Saturday, March 2, 2024

Latest Posts

THANE: भिवंडीत फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन व फन अँड फूड फेस्टिवल साजरा

विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढण्यासाठी तसेच व्यवहाराचे प्रत्यक्षात ज्ञान मिळण्यासाठी टी. ए .पाटील इंग्लिश मिडियम स्कूल व राईज प्री स्कूल मधील विद्यार्थ्यांचा फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन फन अँड फूड फेस्टिवल साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन शुभ आयुष इंग्लिश मिडियम स्कूलच्या संस्थापिका अध्यक्षा शितल तोंडलकर यांच्या हस्ते करण्यात आले.

फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन साठी नर्सरीमधील विद्यार्थ्यांनी अल्फाबेट वॉक, ज्युनिअर केजी कम्युनिटी हेल्पर आणि सिनियर केजी यांनी सोशिअल संदेश देण्याचे काम केले. इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी खाद्यपदार्थांचे स्टॉल उभारून व्यवहार ज्ञान तसेच वेगवेगळे खाद्यपदार्थ बनवून सर्व पालकांना ग्रामस्थांना खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता आला. सदर कार्यक्रमात दीड ते दोन लाखाची उलाढाल झाल्याची समजले. तसेच कार्यक्रमास एक ते दिड हजार पालक व ग्रामस्थ उपस्थित होते. फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनसाठी परीक्षक म्हणून मयुरी बिडवी तसेच सविता कोठावदे यांनी काम पाहिले. कार्यक्रमाच्या शेवटी विजयी विद्यार्थ्यांची नावे घोषित करण्यात आली. सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कमिटीच्या मार्गदर्शनाखाली विशेष मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.

हे ही वाचा:

Christmas Wish 2023, ख्रिसमस निम्मित तुमच्या प्रियजनांना व्हाट्सअँपद्वारे द्या खास शुभेच्छा

भारतातील ‘या’ ठिकाणी ख्रिसमस सण मोठ्या धामधुमीत होतो साजरा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss