Friday, May 17, 2024

Latest Posts

स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्यास महाराष्ट्रात फिरू देणार नाही; राहुल गांधी यांच्या सभेपूर्वी मनसेचा इशारा

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रामध्ये येऊन धडकली आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रामध्ये येऊन धडकली आहे. १७ मार्चला मुंबईमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात त्यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यांच्या या बैठकीपूर्वी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राहुल गांधी यांना इशारा दिला आहे. काही दिवसांआधी राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल अपमानास्पद विधान केले होते. त्यानंतर आता राहुल गांधी यांनी पुन्हा जर स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल कुठलेही अपमानास्पद विधान केले तर त्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून देण्यात आला आहे.

मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले, छत्रपती शिवाजी पार्क मैदानामध्ये आत्तापर्यंत अनेक वाघांनी डरकाळ्या या मैदानाने ऐकले आहेत. स्वतंत्र वीर सावरकर, बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे या दिग्गजानी शिवाजी पार्क मैदानावर सभा घेतल्या आहेत, त्यांच्या डरकाळ्या या मैदानाने ऐकल्या आहेत. मात्र १७ तारखेला होणाऱ्या सभेमध्ये काँग्रेसच्या कोल्ह्यांची कुई कुई ऐकण्याचे दुर्भाग्य महाराष्ट्राला राबणार आहे. चबरोबर वाघाचं कातडे पांघरलेले लांडगे सुद्धा या सभेला असतील. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे,असे संदीप देशपांडे म्हणाले. दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज मैदान हे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकासमोर आहे. शिवाजी पार्क जवळ त्याचे घर आहे. तुम्ही महाराष्ट्रात येत आहे, तुमचं म्हणणं मांडा, आमचं याला ना नाही.पण मागच्या वेळी सावरकरांबद्दल कुठलंही अपमान जनक वक्तव्य केल्यास, महाराष्ट्रातील १४ कोटी जनता राहुल गांधींना महाराष्ट्रात फिरू देणार नाही. या कोल्ह्यांबरोबर सामील झालेले जे हे लांडगे आहे, त्यांनी पण लक्षात ठेवावं. अन्यथा महाराष्ट्रात त्यांची काही खैर नाही, असा इशारा संदीप देशपांडे यांनी दिला आहे.

राहुल गांधी यांनी या सभेतून प्रचाराचा नारळ फोडा, अजून काय फोडायचं ते फोडा, आमचा त्याला विरोध नाही. आमचा इशारा फक्त स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दलच्या वक्तव्यावर आहे. याआधीसुद्धा राहुल गांधी हे भारत जोडो न्याय यात्रेचा निमित्ताने महाराष्ट्रामध्ये आले होते. त्यावेळेस त्यांनी सावरकरांबद्दल अपमान जनक विधान केले होते. त्यामुळे त्यांना आता ही पहिली वार्निंग आहे.असे न केल्यास महाराष्ट्रातील १४ कोटी जनता महाराष्ट्रात फिरू देणार नाही. सावरकरांबद्दल अपमान झाला तर तो खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा संदीप देशपांडे यांनी दिला आहे.

हे ही वाचा:

प्रेमाची गोष्ट : मुक्ता मॉडलिंग करण्यासाठी देणार होकार,तर सावनीचा फिसकटणार प्लॅन

महाराष्ट्रात “अबकी बार ४५” चा आकडा गाठायचाय – Dr. Shrikant Shinde

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss