कर चोरीप्रकरणी GST विभागाकडून संचालकांना अटक

कर चोरीप्रकरणी GST विभागाकडून संचालकांना अटक
महाराष्ट्र शासनाच्या वस्तू व सेवाकर विभागाने कर चुकवेगिरी प्रकरणात ६ कोटी ४० लाख रुपयांचा घोटाळा उघडकीस आणला आहे. बोगस बिलांसंदर्भात जीएसटी विभागाकडून सुरु असलेल्या घडक मोहिमेअंतर्गत कमलेश बाबुलाल जैन आणि भावना कमलेश जैन या दोन संचालकांना अटक करण्यात आली. मे. मोनोपोली इनोव्हेशन्स प्रा.लि. या कंपनी विरोधात वस्तू व सेवाकर विभागाकडून अन्वेषण कारवाई सुरु करण्यात आली होती. कारवाई दरम्यान या व्यापाऱ्याने नोंदणी दाखला रद्द झालेल्या व्यापाऱ्याकडून खरेदी व विक्री दाखवून ६.४० कोटी रुपयांची महसूल हानी केली आहे.
या व्यापाऱ्याने नोंदणी दाखला रद्द झालेल्या व्यापाऱ्याकडून खरेदी दाखवुन ३.२३ कोटी रुपयांची चुकीची कर वजावट घेऊन तसेच, मालाशिवाय फक्त बिले देऊन ३.१७ कोटी रूपयांची शासनाची महसूल हानी केल्याचे निदर्शनास आले.
महानगर दंडाधिकारी यांनी आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ही धडक कारवाई राज्यकर सहआयुक्त  प्रेरणा देशभ्रतार आणि राज्यकर उपायुक्त राजेंद्र टिळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक राज्यकर आयुक्त डी. के. शिंदे यांनी राबविली. या कार्यवाहीत सर्व राज्यकर निरीक्षकांचे महत्त्वाचे योगदान राहीले.
सर्व समावेशक नेटवर्क विश्लेषण साधनांचा वापर करुन आणि इतर विभागांशी समन्वय साधून महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभाग कर चुकवणाऱ्या व्यापाऱ्यांचा शोध घेत आहे. या मोहिमेद्वारे महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाद्वारे २०२४-२५ या आर्थिक वर्षात पहिल्याच अटक कारवाईद्वारे कर चुकवेगिरी करणाऱ्यांना इशारा दिला आहे.

हे ही वाचा:

लढाई फक्त VBA आणि BJP मध्ये, Prakash Ambedkar यांचे कार्यकर्त्यांना पत्र

Nitin Gadkari यांच्यासारखा भ्रष्टाचारी संपूर्ण महाराष्ट्रात नाही, Congress नेत्याचे गंभीर आरोप

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version