Tuesday, April 30, 2024

Latest Posts

Nitin Gadkari यांच्यासारखा भ्रष्टाचारी संपूर्ण महाराष्ट्रात नाही, Congress नेत्याचे गंभीर आरोप

देशभरात आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Loksabh election 2024) पार्श्वभूमीवर वातावरण चांगलेच गरम झाल्याचे दिसत आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नसून एकमेकांवर आरोप- प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. अश्यातच केंद्रीय मंत्री आणि नागपूर लोकसभा मतदारसंघाचे (Nagpur Loksabhaa Constituency) भाजपचे (BJP) उमेदवार नितीन गडकरी (Nitin Gaadkari) यांच्यावर भ्रष्टाचारचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. काँग्रेस नेते विलास मुत्तेमवार (Vilas Muttemwar) यांनी गडकरींवर गंभीर आरोप करत, “गडकरींसारखा भ्रष्टाचारी संपूर्ण महाराष्ट्रात कोणी नाही,” असे वक्तव्य केले आहे. विलास मुत्तेमवार यांच्या वक्तव्याने एकाच खळबळ उडाली असून राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे दिसत आहेत.

नागपूर (Nagpur) येथे झालेल्या प्रचारसभेत बोलताना काँग्रेसचे (Congress) वरिष्ठ नेते आणि माजी खासदार विलास मुत्तेमवार यांनी नितीन गडकरींवर आरोप करत म्हणाले, “नागपुरात जुन्या पायाभूत सुविधा तोडून नवीन पायाभूत सुविधा उभारण्याच्या नावाखाली भाजपवाल्यांनी आपल्याच लोकांना कंत्राट दिले. त्यासाठी सिमेंट, गिट्टी, वाळू पुरवठा करण्याचे कंत्राट आपल्याच कार्यकर्त्यांना दिले. म्हणूनच, नागपूरमधील महाजपचे सर्व लोक श्रीमंत झाले.”

पुढे ते म्हणाले, “नागपूरसाठी एम्स रुग्णालय आमच्या काळात मंजूर झाले, ते आम्ही गव्हर्नमेन्ट मेडिकल कॉलेजमध्ये उभारणार होतो. मात्र गडकारींनी नागपूर शहराच्या २० किलोमीटर बाहेर हे एम्स हॉस्पिटल नेले. आम्ही बनवलेले डांबरी रस्ते भाजपवाल्यांनी फोडून काढले. जुने फ्लायओव्हर्स पडून नवीन बांधले. नागपुरात १ लाख कोटींची कामे केल्याचे नितीन गडकरी सांगत आहेत, पण हे खोटं आहे. नुसतं भाव वाढवून, आवश्यकता नसेल तिथे रस्ता बांधून, छोट्या रस्त्यांऐवजी मोठा रस्ता बांधून गडकरींनी फक्त भ्रष्टाचार केला. गडकरींसारखा भ्रश्टाचारी संपूर्ण महाराष्ट्रात कोणी नाही.”

विलास मुत्तेमवार यांच्या या गंभीर आरोपांनंतर नितीन गडकरी आणि भाजप यावर काय प्रत्युत्तर देणार यावर सर्वांचे लक्ष लागले आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघात १९ एप्रिल ला मतदान पार पडणार असून महायुतीचे (Mahayuti) नितीन गडकरी विरुद्ध महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghaadi) विकास ठाकरे (Vikas Thakre) यांच्यात लढत होणार आहे.

हे ही वाचा:

Ajit Pawar सत्तेशिवाय राहू शकत नाहीत, Rohit Pawar यांची टीका

मतांसाठी श्रीरामाचा गैरवापर, Nitin Gadkari यांची उमेदवारी रद्द करा, Congress चे Atul Londhe यांची मागणी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss