Sunday, May 19, 2024

Latest Posts

Eknath Shinde यांच्याकडून जुहू बीचवर करण्यात आली स्वच्छता, रस्त्यावर पाणी मारत…

सध्या मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात प्रदूषणाचे प्रमाण हे वाढले आहे. मुंबईतील वाढतं प्रदुषण पाहता सरकारकडून उपाययोजना करण्यात येत आहेत.

सध्या मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात प्रदूषणाचे प्रमाण हे वाढले आहे. मुंबईतील वाढतं प्रदुषण पाहता सरकारकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. मुंबईत ठिकठिकाणी स्वच्छता केली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या स्वच्छता मोहिमेचा आढावा घेतला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: या स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला.

याजेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी ट्रॅक्टरचं स्टेरिंग आपल्या हाती घेतलं. तसंच पाण्याचा पाईप हाती घेत स्वतः स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. डीप क्लिन ड्राईव्ह उपक्रमाला सुरुवात झाली आहे. या उपक्रमाअंतर्गत होणाऱ्या स्वच्छतेच्या कामाची मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. सध्या मुंबईतील समुद्र किनारी ऑटोमॅटिक मशीनमधून कचरा उचलला जातो. त्यामुळे समुद्र किनारी असणारी वाळू तशीच राहते. यामुळे प्रदुषण नियंत्रणात आणण्यासाठी मदत मिळेल. शहरापासून झोपडपट्टीपर्यंत टप्या टप्प्याटप्प्यात सगळीकडे स्वच्छता केली जाईल. मुंबईतील प्रदुषण रोखण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जुहूमधील इस्कॉन मंदिरात जात दर्शन घेतलं. तसंच आरती देखील केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मंदिराच्या पुजाऱ्यांकडून मंत्रोच्चार करून स्वागत करण्यात आलं. इस्कॉन स्वतः चांगला उपक्रम राबवत आहे. अन्नदान , परियावरण , तरुण मार्गदर्शन सह पालिकेच्या सोबत मिळून रुग्णालय व शाळेत अन्नदान करणं मोठं काम आहे, असं शिंदे म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जुहू परिसरातील आय लव मुंबई सेल्फी पॉईंट उद्यानाला भेट दिली. यावेळी मंत्री दीपक केसरकर, मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त आणि स्थानिक आमदार दीपक सावंत यांच्यासोबत फोटो सेक्शन करत उद्यानाची त्यांनी पाहणी केली. देशाचे प्रधानमंत्री देशाला उंच नेण्याचं काम करतात. आज स्वच्छता मोहीममध्ये आपल्याला ही सहभागी करून घेणार आहोत. स्वच्छता मोहीम ही चळवळ म्हणून मी व्यक्तीशा लक्ष देतोय. मुंबईचा सफाई चा हिरो हा सफाई कर्मचारी आहे. मी आव्हान केल्यानंतर एकदाच लवकर येऊन ते काम करतात. याचा परिणाम खूप चांगला होईल, असंही ते म्हणाले.

हे ही वाचा:

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस गाजण्याची शक्यता

पुणेकरांनी मेट्रोकडे पाठ फिरवली, चार महिन्यात एवढ्या प्रमाणात उत्पादन घटले

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss