Saturday, July 27, 2024

Latest Posts

पुणेकरांनी मेट्रोकडे पाठ फिरवली, चार महिन्यात एवढ्या प्रमाणात उत्पादन घटले

पुणे मेट्रो २ च्या नवीन मार्गिकेचे उदघाट्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १ ऑगस्ट रोजी झाले होते.

पुणे मेट्रो २ च्या नवीन मार्गिकेचे उदघाट्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १ ऑगस्ट रोजी झाले होते. सिव्हिल कोर्ट ते पिंपरी चिंचवड आणि गरवारे कॉलेज स्टेशन ते रूबी हॉल हे दोन मार्ग पुणेकरांना उपलब्ध करून देण्यात आले. त्यानंतर पुणेकरांसाठी मेट्रोचे तिसरा मार्ग शिवाजीनगर ते हिंजेवाडीचे काम सुरु करण्यात आले आहे. येत्या एप्रिलपर्यंत तिसऱ्या मार्गिकेचे काम पूर्ण होणार आहे. पुणेकरांमध्ये मेट्रोबद्दल आकर्षण करण्यासाठी शनिवार आणि रविवारी मेट्रोमधून प्रवासासाठी सुट दिली जात आहे. परंतु आता मात्र पुणेकरांची मेट्रोची क्रेज संपली की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.गेल्या चार महिन्यांपासून पुणेकरांमध्ये मेट्रोची क्रेझ कमी झाली आहे.

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात मेट्रोचे जाळे मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. मात्र प्रवाशांनी आता पुणे मेट्रोकडे पाठ फिरवली आहे. पिंपरी ते सिव्हिल कोर्ट आणि वनाज ते रुबी हॉल या दोन्ही मार्गावर नोव्हेंबर महिन्यात फक्त १४ लाख १८ हजार प्रवाशांनी प्रवास केला आहे. मागील काही महिन्यांपासून पुणेकरांनी मेट्रोकडे पाठ फिरवली आहे. ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये सहा लाख प्रवासी संख्या घटली आहे. काही महिन्यांपूर्वी शहरातून भुयारी मेट्रो सुरु करण्यात आली. या मेट्रोची नागरिकांमध्ये सुरुवातीचे काही दिवस उत्सुकता होती. कार्यालयात जाणारे किंवा इतर कामानिमित्त प्रवास करण्यासाठी पुणेकर मेट्रोने प्रवास करत होते. ऑगस्ट महिन्यात २० लाख ४७ हजार प्रवाशांनी मेट्रोतून प्रवास केला होता. त्यानंतर हळूहळू मेट्रोने प्रवास करणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. नोव्हेंबर महिन्यात प्रवासी संख्या १४ लाखांच्या आतमध्ये आल्यामुळे उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. लोकल ट्रेनच्या तुलनेमध्ये मेट्रोची तिकीट जास्त आहे. मेट्रो स्थानकात प्रवाशाना पार्किंगसाठी जागा कमी पडत आहे. त्यामुळे बऱ्याच नागरिकांनी मेट्रोकडे पाठ फिरवली आहे.

ऑगस्ट महिन्यात प्रवासी संख्या २० लाख ४७ हजार होती यामधून ३कोटी ७ लाख रुपये उत्पन्न मिळाले होते.
सप्टेंबर महिन्यात प्रवासी संख्या २० लाख २३ हजार होती यामधून २ कोटी ९८ लाख रुपये उत्पन्न मिळाले होते.
ऑक्टोबर महिन्यात प्रवासी संख्या १६ लाख ७२ हजार होती यामधून २ कोटी ४८ लाख रुपये उत्पन्न मिळाले होते.
नोव्हेंबर महिन्यात प्रवासी संख्या १४ लाख १८ हजार होती यामधून २ कोटी २० लाख रुपये उत्पन्न मिळाले.

हे ही वाचा:

‘अ‍ॅनिमल’मधील इंटिमेट सीन शूट करताना सेटवर फक्त ५ जण, तृप्ती डिमरीनी दिली प्रतिक्रिया

कामत यांच्याकडून शिंदे गटाच्या आमदारांची उलटतपासणी सुरू

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss