Saturday, July 27, 2024

Latest Posts

मैत्रीचा प्लॅन करत माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या

मुंबईच्या महानगरपालिकेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Former corporator Abhishek Ghosalkar) यांची काल रात्री हत्या करण्यात आली.

मुंबईच्या महानगरपालिकेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Former corporator Abhishek Ghosalkar) यांची काल रात्री हत्या करण्यात आली. या हत्यानंतर सगळीकडे चांगलेच वातावरण पेटले आहे. घोसाळकर यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली. या हत्येनंतर मुंबई पोलिसांकडून या संपूर्ण प्रकरणाचा तपास केला जात आहे. अभिषेक घोसाळकर यांच्यावर जुन्या रागातून मॉरिस नोरोन्हा (Morris Noronha) याने गोळी मारून हत्या केली, असा अंदाज वर्तवला जात आहे.

अभिषेक घोसाळकर यांची हत्या करणारा मॉरिस नोरोन्हा (Morris Noronha) यांच्या विरोधात अनेक गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. मुंबईतील एमएचबी पोलीस ठाण्यात कलम ३७६ नुसार बलात्कार आणि ५०९ विनयभंग करण्याच्या उद्देशाने महिलेला अश्लील शेरेबाजी केल्याचे दोन गुन्हे दाखल आहेत. काही दिवसांआधी मॉरिस नोरोन्हाला बलात्कार प्रकरणी अटक करण्यात आली होती. या दोन्ही गुन्ह्यात अटक झाल्यानंतर मॉरिस पुण्यातील येरवडा कारागृहात होता. अभिषेक घोसाळकर याने पोलिसांवर दबाव टाकला, असा संशय मॉरिसला होता. याचा जुन्या रागातून मॉरिसने अभिषेक घोसाळकर यांची हत्या केली, असा संशय व्यक्त केला जात आहे. बलात्काराप्रकरणी मॉरिसला अटक झाल्यानंतर अभिषेक आणि मॉरिस यांच्यातील वाद विकोपाला गेले होते. त्यानंतर जेल मधून बाहेर आल्यावर दोघांमधील वाद मिटल्याचा मॉरिसने बनाव केला. त्यानंतर पुढे काही दिवस अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस यांच्यातील मैत्री वाढत गेली. विशेष बाब म्हणजे अभिषेक घोसाळकर यांच्या वाढदिवसासाठी मॉरिसने मोठ्या प्रमाणावर बॅनरबाजी केली होती. मात्र, मॉरिसच्या डोक्यात वेगळेच प्लॅन चालू होते. मॉरिसने गुरुवारी साडी वाटपाच्या कार्यक्रमासाठी अभिषेक घोसाळकर यांना आपल्या कार्यलयातबोलावून घेतले होते. त्यानंतर रात्री ९ वाजताच्या सुमारास अभिषेक घोसाळकर यांनी फेसबुक लाईव्ह केलं. आमच्यातील सर्व वाढ मिटले आहेत, असे देखील दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर काही क्षणातच घोसाळकरांवर थेट गोळीबार करून मॉरिसने अभिषेक घोसाळकर यांची हत्या केली. घोसाळकर यांची हत्या केल्यानंतर मॉरिसने स्वतःवर गोळ्या झाडल्या.

मागील काही दिवसांपासून राज्यभरात गोळीबाराच्या वेगवेगळ्या घटना घडत आहेत. याआधी आमदार गणपत गायकवाड महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. काल घडलेल्या अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया मांडली. अजित पवार म्हणाले, अतिशय चुकीची घटना घडली आहे. महाराष्ट्रात अशा घटना घडू नयेत. दोघांचे संभाषण स्पष्ट झाले. त्यांचे मित्रत्वाचे संबंध चांगले दिसत आहे. या प्रकरणाचा नीट तपास झाला पाहिजे. माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना आहे. विरोधक सरकारची बदनामी करत असून, मी कोणाचे ही समर्थन करत नाही, असे अजित पवार म्हणाले.

हे ही वाचा: 

मसाल्यांचा राजा म्हणून ‘या’ शहराची आहे ओळख

CM Eknath Shinde Not Out 60, प्रवास वाघाच्या डरकाळीचा आणि गरुडाच्या भरारीचा…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss