जगभरातील प्रत्येक घरामध्ये मसाल्याचे पदार्थ नक्कीच आढळून येतात. भारतीय मसाल्याचे नाव जगभरात सगळीकडे आहे. भारत हे देश विविधतेने नटलेले आहे. भारताची संस्कृती पाहण्यासाठी जभरातील प्रत्येक कोपऱ्यातील नागरिक येत असतात. ट्रॅव्हलर्स, युट्यूबर्स विशेषतः फूड व्लॉगर्स भारतीय खाद्यपदार्थाची चव चाखण्यासाठी भारतामध्ये येतात. मसाल्यांची चव, सुगंध सगळ्यांचं आवडतो. पूर्वीच्या काळापासून मसाल्याचे माहेरघर म्हणून भारताची ओळख आहे. या मसाल्याच्या चवीमुळे भारतीय खाद्यसंस्कृती जगभरात प्रसिद्ध झाली आहे.
भारतामध्ये अनेक ठिकाणी मसाले पिकवले जात्ता. या प्रत्येक मसाल्यांची काही ना काही खासियत आहे. देशभरातील मसाल्याचे माहेर घर म्हणून ओळखलं दक्षिण भारताबद्दल अनेकदा बोलले जाते. दक्षिण भारतामधून अनके मसाले निर्यात केले जातात. पण दक्षिण भारताव्यतिरिक्त मध्यप्रदेश आणि आंध्रप्रदेशातील काही मसाले जगभरात खूप प्रसिद्ध आहेत. आंतरराष्ट्रीय मानक संस्थेच्या यादीमध्ये जगभरातील तब्बल १०९ मसाल्यांचा समावेश आहे. त्यातील ७५ मसाले हे भारतीय आहेत. भारतामध्ये अनेक मसाले तयार केले जातात. त्या मसाल्यांची एक वेगळीच ओळख आणि सुगंध सगळ्यांना चाखायला मिळत आहे. केरळमधील कोझिकोड मसाल्यांचा राजा म्हणून ओळखले जाते. या शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर मसाल्याचे उत्पादन घेतले जाते. काळी मिरी, तेजपत्ता, वेलची, लवंग, दालचिनी, जायफळ आणि व्हेनिला पॉड या सगळ्या मसाल्यांचे उत्पादन घेतले जाते.
भारतातील आंध्र प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणात मिरचीचे उत्पादन घेतले जाते. इथे सर्व प्रकारच्या लाल मिरच्या उपलब्ध आहेत. सर्वात तिखट मिरचीपासून कमी तिखट मिरचीपर्यंत सगळ्या मिरच्या मिळतात. मसाल्यांच्या पदार्थांमध्ये धणे हा पदार्थ खूप महत्वाचा आहे. मध्य प्रदेशात सर्वाधिक धण्याचे उत्पादन घेतले जाते. भारतीय मसाल्यांचा वारस अनेक शतकांपासून आहे. मुघल आणि इंग्रजांनाही भारतीय मसाल्यांचे वेड होते.
हे ही वाचा:
घटस्फोटाच्या मुद्द्यावर अंकिता लोखंडेने सोडले मौन
बाप बदलण्याची नवीन पद्धत सध्या राजकारणात सुरू आहे;रोहिणी खडसेंची अजित पवारांवर टीका