मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनसला आज दुपारच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीचे अनेक दृश्य समोर आले आहेत. टिळक टर्मिनसला मोठ्या प्रमाणावर आग लागली आहे. लोकमान्य टिळक टर्मिनसवरील बुकिंग आणि वेटिंग हॉलमध्ये आग लागली आहे. लागलेल्या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले आहेत. आग लागल्यानंतर पोलिसांनी सर्व प्रवाशांना रेल्वे स्थानकातून बाहेर काढले आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम शर्थीने सुरु आहे.
ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. या आगीमध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. तसेच लागलेल्या या आगीमध्ये कोणीही जखमी झालं नाही. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरु आहे. आग अशी अचानक कशी लागले? असा प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित केले जात आहेत. पोलीस आणि प्रशासनही आगीमागील कारण शोधात आहेत.
हे ही वाचा:
Year End 2023, या वर्षी लोक सर्वात जास्त कोणत्या ठिकाणी गेलेत? घ्या जाणून
विधानसभेत प्रणिती शिंदे-तानाजी सावंत यांच्यात रंगली जुगलबंदी