Friday, April 19, 2024

Latest Posts

VBA SUJAT AMBEDKAR यांची मुंबईत जन संवाद यात्रा

वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) युवा नेते सुजात आंबेडकर (Sujat Ambedkar) यांच्या नेतृत्वात मुंबई येथे ‘जन संवाद यात्रा’ काढण्यात आली होती. या जन संवाद यात्रेत (Jan Sanvad Yatra) नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. वंचित बहुजन आघाडीने वारंवार इंडिया आघाडी सोबत जाऊन भाजपला हरवण्याची इच्छा दर्शवली आहे. नेहमी वंचित बहुजन आघाडी सोबत जाण्यासाठी वेळोवेळी सांगितले देखील आहे. यात वंचित बहुजन आघाडीची भूमिका स्पष्ट आहे, असं वाटतं असल्याचे सुजात आंबेडकर यांनी सांगितले.

मुंबईतील (Mumbai) कार्यकर्त्यांची इच्छा होती की, ही जनसंवाद यात्रा व्हावी.यात मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचे असलेले अनेक विषय आहेत. मुंबईतील प्रदूषण (Pollution), महागाई, इकडच्या नागरिकांच्या अनेक समस्या आहेत. ही जन संवाद यात्रा त्यांच्या समस्या समजून घेण्यासाठी आहे. वंचित बहुजन आघाडी एक पक्ष म्हणून या समस्या सोडवण्यासाठी काय करू शकते? याबद्दल तोडगा काढण्यासाठी या जन संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी दिली. 

हे ही वाचा:

‘निव्वळ निवडणुकांसाठीचे हे गाजर’…आरक्षण मिळाल्यानंतर किरण मानेंनी केलेली पोस्ट लक्षवेधी 

‘मराठा लढतो तेव्हा इतिहास घडतोच’…आरक्षण मिळाल्यानंतर प्राजक्ता गायकवाडची खास पोस्ट

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss