Wednesday, February 28, 2024

Latest Posts

मुंबईतील सर्व लोकल एसी करण्याबाबत मेगाप्लॅन

मुंबईतील सध्याच्या धावणाऱ्या एसी लोकल आणि त्यात प्रवास करणारे प्रवासी, तसेच नॉन एसी लोकलमध्ये प्रवास करणारे प्रवासी यांचा अभ्यास करून सिस्ट्रा या सल्लागार समितीने अहवाल तयार केलंय.

मुंबईतील सर्व लोकल या एसी लोकल करण्यासाठी केंद्र सरकार आग्रही आहे. याची जबाबदारी मुंबई (mumbai) रेल विकास कॉर्पोरेशनवर आहे. पण सर्वच लोकल एसी करण्याआधी मुंबईकर त्यासाठी तयार आहेत का? सध्याच्या एसी लोकलमध्ये कोणते बदल अपेक्षित आहेत, जेणेकरून त्यांची क्षमता वाढेल. एसी लोकलचे तिकीट दर कसे असायला हवेत? व्यवस्था कशी असायला हवी ? सर्वच एसी लोकल करण्यासाठी किती कालावधी लागेल. किती टप्प्यांमध्ये हे काम करायला हवे ? या संदर्भात एक प्राथमिक अहवाल बनवण्यात आला आहे. हा अहवाल एबीपी माझाच्या हाती आला आहे. या अहवालात काय सांगितले आहे हे जाणून घेऊयात.

फक्त मुंबई आणि आसपासच्या शहरात धावणाऱ्या मुंबई उपनगरीय रेल्वे सेवेत महत्त्वाचे प्रकल्प आणण्यासाठी आणि या उपनगरीय रेल्वे सेवेचा विकास करण्यासाठी मुंबई रेल विकास कॉर्पोरेशन ची स्थापना करण्यात आली. या संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट बनवण्यात येतात आणि रेल्वे मंत्रालयाला मंजुरीसाठी पाठवण्यात येतात. याच एमयूटीपी मध्ये मुंबईकरांसाठी २३८ एसी लोकल मंजूर करण्यात आल्या होत्या. या माध्यमातून हळूहळू मुंबईतील सर्वच लोकल एसी करण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले होते. पण सर्वच लोकल एसी करण्याला काही मुंबईकरांचा विरोध देखील आहे. त्यामुळे एमआरव्हीसीने हा विरोध कमी करण्यासाठी एका खासगी सल्लागार कंपनी मार्फत प्रार्थामिक अहवाल बनवला. हा अहवाल २ डिसेंबर रोजी एम आर व्ही सी कडे देण्यात आला.

अहवालात ४ टप्पे
मुंबईतील सध्याच्या धावणाऱ्या एसी लोकल आणि त्यात प्रवास करणारे प्रवासी, तसेच नॉन एसी लोकलमध्ये प्रवास करणारे प्रवासी यांचा अभ्यास करून सिस्ट्रा या सल्लागार समितीने अहवाल तयार केलंय. या अहवालात ४ टप्पे सांगण्यात आले आहेत, पहिला प्रिपरेशन म्हणजे पूर्व तयारी, नंतर लर्निग म्हणजे कर्माच्यांना ट्रेनिंग देणे, मग बिल्ट अप म्हणजे एसी गाड्या बनवणे, त्यासाठी प्लॅटफॉर्म आणि इतर सोयी सुविधा तयार करणे आणि शेवटी केलेल्या तयारीनंतर शंभर टक्के गाड्या एसी चालवणे असे टप्पे सांगण्यात आले आहेत.

हे ही वाचा:

Politics: RAJASTHAN आणि MAHARASHTRA मिळून सहकार्याचा अध्याय सुरू करण्याबाबत मुख्यमंत्र्यांचे एकमत

माधुरी दीक्षित  यांच्या ‘पंचक’ चित्रपटाची बॉलिवूडलाही पडली भुरळ,कलाकारांकडून शुभेच्छांचा वर्षाव

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss