Saturday, July 27, 2024

Latest Posts

Politics: RAJASTHAN आणि MAHARASHTRA मिळून सहकार्याचा अध्याय सुरू करण्याबाबत मुख्यमंत्र्यांचे एकमत

राजस्थानचे नवनियुक्त मुख्यमंत्री भजनलाल शर्मा (RAJASTHAN CM Bhajanlal Sharma) यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच एकमेकांना सहकार्य करून दोन्ही राज्यांचा विकास करण्याबाबत या दोघांचे एकमत झाले. महाराष्ट्र हे उद्यमशील राज्य असून शेती, उद्योग, व्यापार, कला, संस्कृती यांचे केंद्र आहे. या क्षेत्रात एकमेकांना मदत करून दोन्ही राज्यांना प्रगतीच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी लागेल ते सर्व सहकार्य करू, असे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ  शिंदे यांनी सांगितले.

राजस्थान (RAJASTHAN) मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM EKNATH SHINDE) हे एनडीएचे घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचे मुख्य नेते (SHIVSENA MAIN LEADER) म्हणून प्रचारामध्ये सहभागी झाले होते. या निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय होऊन ११५ जागी भाजपचे (BJP) उमेदवार विजयी झाले. यात मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रचार केलेले तीनपैकी हवा महल आचार्य योगी बालमुकुंद आणि कोठपुतली मतदारसंघातील हंसराज पटेल (HANSRAJ PATEL) हे दोन उमेदवारही विजयी झाले. राजस्थानचे मुख्यमंत्री शर्मा यांनी मुख्यमंत्री शिंदे यांनी केलेल्या या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानले. तसेच आगामी काळात देखील असेच सहकार्य कायम ठेवावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

हे ही वाचा:

माधुरी दीक्षित  यांच्या ‘पंचक’ चित्रपटाची बॉलिवूडलाही पडली भुरळ,कलाकारांकडून शुभेच्छांचा वर्षाव

अदानी समूहाविरोधात ठाकरेंची डरकाळी, उद्या निघणार भव्य मोर्चा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss