Friday, April 19, 2024

Latest Posts

Mumbai Municipal Corporation Budget 2024-2025 : ‘ही’ आहेत अर्थसंकल्पीय प्रमुख वैशिष्ट्ये

दिनांक १ फेब्रुवारी २०२४ रोजी केंद्रीय बजेट हे सादर करण्यात आले. केंद्रीय बजेट सादर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजेच २ फेब्रुवारी रोजी मुंबई महापालिकेचा (BMC Budget 2024) आगामी वर्षासाठीचा अर्थसंकल्प (Budget २०२४-२५) सादर केला जातो. संपूर्ण मुंबईकरांचं लक्ष आज सादर झालेल्या अर्थसंकल्पाकडे होतं. मुंबई महापालिकेची आगामी निवडणूक (BMC Elections) डोळ्यांसमोर ठेवून हा अर्थसंकल्प सादर होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वर्तवली जात होती. मुंबई महापालिकेत निवडून आलेल्या नगरसेवकांची मुदत ७ मार्च २०२२ रोजी संपली होती. त्यानंतर गेल्या दीड वर्षांपासून बीएमसीच्या कारभाराचा गाडा आयुक्त आणि प्रशासक इक्बाल सिंह चहल यांच्याकडून हाकला जात आहे. गेल्या वर्षी पहिल्यांदाच प्रशासकांकडून अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. मुंबई महापालिकेची निवडणूक अजूनही झालेली नसल्यानं, यंदा सलग दुसर्‍या वर्षी प्रशासकांकडून अर्थसंकल्प सादर करण्यात आला.

वित्तीय वर्ष २०२४-२०२५ ची अर्थसंकल्पीय प्रमुख वैशिष्ट्ये :-

 • बृहन्मुंबई महानगरपालिकेचे वित्तीय वर्ष २०२४-२०२५ चे अर्थसंकल्पीय अंदाज ५९,९५४.७५ कोटी रुपये.
 • गतवर्षी (२०२३-२०२४) चे अर्थसंकल्पीय अंदाज ५४,२५६.०७ कोटी रुपयांचेयंदाचे अर्थसंकल्पीय अंदाज मागील वर्षाच्या तुलनेत १०.५० टक्क्यांनी अधिक. यंदाचा अर्थसंकल्पीय अंदाज ५८.२२ कोटी रुपये शिलकीचा.
 • अंदाजित महसूली उत्पन्न ३५,७४९.०३ कोटी रुपये गुंतवणुकीवरील व्याजातून २,२०६.३० कोटी रुपये उत्पन्नाचा अंदाज जकातीपोटी नुकसान भरपाई म्हणून १३,३३१. ६३ कोटी रुपये.
 • महसूली खर्चासाठी २८,१२१.९४ कोटी तर भांडवली खर्चासाठी ३१,७७४.५९ कोटी रुपये तरतूद.
 • भांडवली खर्च आणि महसुली खर्चाचे गुणोत्तर प्रमाण ५३:४७.
 • तात्पुरत्या अंतर्गत हस्तांतरणाद्वारे(Internal Temporary Transfer-ITT) ११,६२७.५४ कोटी रुपये निधी उभारणी प्रस्तावित.
 • आरोग्य, पायाभूत सुविधा, स्वच्छता, प्रदूषण नियंत्रण यावर प्रामुख्याने भर.
 • स्वच्छ, सुंदर व हरित मुंबईसाठी ३१,७७४.५९ कोटी रुपये तरतूद.
 • महानगरपालिका रुग्णालयांमध्ये ‘मुख्यमंत्री शून्य प्रिस्क्रिप्शन धोरण’, ५०० कोटी रुपये तजवीज.
 • मुंबईकरांच्या आरोग्यासाठी ७,१९१.१३ कोटी रुपये तरतूद.
 • अर्थसंकल्पीय अंदाजातील १२ टक्के रक्कम आरोग्यासाठी.
 • सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालयांसाठी ११० कोटी रुपये खर्चून ‘टेस्ला-३ एमआरआय मशीन’ खरेदी करणार.
 • वित्तीय वर्ष २०२४-२०२५ मध्ये ६ अतिरिक्त पॉलिक्लिनीक व डायग्नॉस्टिक सेंटर्स आणि ५४ हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरु करण्याचे प्रस्तावित.
 • ‘मुख्यमंत्री आरोग्य आपल्या दारी’ उपक्रम राबविणार.
 • कर्करोग नियंत्रण मॉडेल, हृदय संजीवनी केंद्र स्थापन करणार.

मुंबई महापालिकेचा (BMC Budget 2024) हा अर्थसंकल्प आतापर्यंतचा सर्वात मोठा अर्थसंकल्प असल्याचे बोलले जात आहे.

हे ही वाचा:

हिवाळ्यात पायांच्या तळवे-टाचा होतात कडक,जाणुन घ्या घरच्या घरी डेट स्किन स्वच्छ करायच्या टिप्स

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्य घोटाळ्या प्रकरणी पाचव्यांदा ईडीचा समन्स

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss