कारागृह म्हटले की, संपूर्णतः अंधाऱ्या खोल्या, बंदिस्त वातावरण, नियमांची सरबत्ती, प्रत्येक कामासाठी रांगांची शिस्त आणि एक ना अनेक शिक्षा..असंच चित्र प्रत्येकाच्या डोळ्यासमोर असतं. पण या चित्रात आता काहीसा बदल दिसून येणार आहे. मुंबईच्या (MUMBAI) भायखळा तुरुंगाने (BYCULLA JAIL) आयोजित केलेल्या विशेष उपक्रमाचे सर्वांकडून स्वागत केले जात आहे. आता भायखळा कारागृहातील महिला कैद्यांचे मनोरंजन (ENTERTAINMENT) केले जाणार आहे. महिला कैद्यांचे मनोरंजन व्हावे, या दृष्टीने आता एफएम रेडिओ सेंटरची (FM RADIO CENTRE) स्थापना करण्यात आली आहे. भायखळा जिल्हा कारागृह आणि मुंबई जिल्हा महिला कारागृहाच्यावतीने विशेष उपक्रम राबविला जात आहे. या कारागृहामध्ये पुरुष आणि महिला कैद्यांच्या मनोरंजनासाठी ‘FM रेडिओ सेंटर’ ची स्थापना करण्यात आली आहे. ‘FM रेडिओ सेंटर’ मध्ये कारागृहातील महिला कैदी असेलल्या श्रद्धा चौगुले यांनी ‘FM रेडिओ सेंटर’ मध्ये रेडिओ जॉकीचे (RADIO JOCKEY) काम केले आहे.
जेलमध्ये गेल्यानंतर तिथे अनेक प्रकारचे कैदी पाहायला मिळत असतात. अनेक प्रकारचे गुन्हे करून कैदी कारागृहात बंदिस्त केलेले असतात. कारागृहात असतांना केलेल्या चुकीबद्दल वाटणारे दुःख तर कधी मनात वाढत चाललेली अस्वस्थता यामुळे गुन्हेगाराच्या मनात वेग-वेगळे विचार येत असतात. कुटुंब, भविष्य आणि केलेला गुन्हा याबाबतची चिंता कैद्याला सतावत असते. त्यांच्या या विचारांना कुठेतरी स्वल्पविराम मिळावा, त्यांचा विरंगुळा व्हावा, त्यांचे चार क्षण आनंदाचे जावेत या दृष्टीने ‘FM रेडिओ सेंटर’ (FM RADIO CENTRE) सुरु करण्यात आले आहे.
यासोबतच, भायखळ्याच्या कारागृहात एक अंगणवाडी सुरु करण्यात आली आहे. कारागृहातील कर्मचाऱ्यांसोबत कैद्यांची मुलेसुद्धा या अंगणवाडीत शिकतात. त्यामुळे भायखळा तुरुंगात बालकांमुले उठावाचे वातावरण निर्माण होते. मुलांचा विकासध्या दृष्टीने अंगणवाडीची संकल्पना येथे राबविण्यात येत असल्याचे कारागृहाकडून सांगण्यात आले. भायखळा तुरुंगात सुरु करण्यात आलेले ‘FM रेडीओ सेंटर’ नागपूर आणि पुणे या ठिकाणी देखील सुरु करण्यात आले असून तिथे देखील कैद्यांचा या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे कारागृहाच्यावतीने सांगण्यात आले.
हे ही वाचा:
THANE: आता एसटी महामंडळाचे तिकीट DIGITAL स्वरुपात, सुट्ट्या पैशांची चिंता मिटणार
देशात बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या, खासदार संजय राऊतांची मागणी