सध्या प्रत्येक गोष्ट ऑनलाईन करण्याचा जमाना सुरू असल्यामुळे तिकीट असो किंवा कोणते शॉपिंग असो सगळं काही ऑनलाईन करण्याकडे कल असतो. रेल्वेचे तिकीट ऑनलाइन करण्याचे सुविधा सुरू झाल्यामुळे अनेक प्रवाशांचे रेल्वेच्या तिकिटासाठी रांगेमध्ये उभे राहण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यानंतर आता एसटी महामंडळाने प्रवाशांसाठी डिजिटल पेमेंटच्या (DIGITAL PAYMENT) माध्यमातून तिकीट काढण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. यामुळे बसमध्ये तिकीट काढताना सुट्टे पैसे न मिळण्याची चिंता कुठेतरी मिटणार, असे संकेत दिसून येत आहेत.
प्रायोगिक तत्त्वावर एक नोव्हेंबर पासून डिजिटल पेमेंटचा वापर करण्यास एसटी महामंडळाकडून सुरुवात करण्यात आली होती. या माध्यमातून एसटीच्या ठाणे (THANE) विभागाला गेल्या दीड महिन्यात नऊ लाखांपेक्षा जास्त रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. बऱ्याचदा सुट्ट्या पैशांवरून वाहक आणि प्रवाशांमध्ये वाद होतात. मात्र डिजिटल पेमेंट (DIGITAL PAYMENT) मुळे वाद होणार नाहीत. तसेच सुट्ट्या पैशांची चिंता ही प्रवासांना करायला लागणार नाही.
डिजिटल माध्यमाद्वारे प्रवाशांना टिकीट खरेदी करता येणार आहे. यासाठी अँड्रॉइड तिकीट इशू मशीन्स (ANDROID TICKET ISSUE MACHINES) एसटी महामंडळाच्या सेवेत रुजू करण्यात आल्या आहेत. या मशीनमुळे प्रवासी रोख पैशांऐवजी यूपीआय क्यूआर कोडचा वापर करून तिकीट काढू शकत आहेत. प्रायोगिक तत्वावर एक नोव्हेंबर पासूनच एसटीमध्ये डिजिटल पेमेंट (DIGITAL PAYMENT) सुविधांचा वापर करण्यास सुरुवात करण्यात आली होती. तेव्हापासून १८ नोव्हेंबर पर्यंत दीड महिन्यात एसटीच्या ठाणे विभागाला डिजिटल प्रणाली द्वारे झालेल्या तिकीट विक्रीतून नऊ लाख सहा हजार ६८५ रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. ठाणे जिल्ह्यातील अनेक आगारांमध्ये डिजिटल पेमेंटमुळे फायदा झाल्याचे दिसून येत आहे. ठाण्यातील भिवंडी आगाराला १० हजार तर शहापूर आगाराला १ हजार, कल्याण आगाराला ८ हजार तर मुरबाडला १४ हजार रुपय उत्पन्न प्राप्त झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
हे ही वाचा:
THANE: भिवंडीतील अपघातात दोघांचा मृत्यू, पोलिसांकडून तपास सुरु
ROHIT PAWAR यांचे FACEBOOK HACK, चुकीची माहिती दुर्लक्षित करण्याचा दिला सल्ला