Sunday, May 19, 2024

Latest Posts

MUMBAI: फलाटांचे क्रमांक बदलले, पुढे होणाऱ्या गोंधळाचे काय?

मध्य रेल्वेकडून (CENTRAL RAILWAY) फलक, उद्घोषणा तयार करणे व इतर कामे हाती घेण्यात आली होती. ही कामे पूर्ण झाल्यानंतर आजपासून फलाटांचे क्रमांक बदलण्यात आले आहेत. परंतु, त्यांनतर सुद्धा प्रवाशांमध्ये गोंधळ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

मध्य (CENTRAL) आणि पश्चिम रेल्वेच्या (WESTERN RAILWAY) विभागाच्या दादर स्थानकातून (DADAR STATION) रोज लाखोंच्या संख्येने प्रवासी प्रवास करतात. असे असूनही, दोन्ही विभागांच्या दादर स्थानकाच्या फलाटांचे क्रमांक वेगवेगळे असल्याने प्रवाशांचा अनेकदा गोंधळ उडतो. हा गोंधळ दूर करण्यासाठी ९ डिसेंबर रोजी अर्थात आजपासून  फलाटांचे क्रमांक बदलण्यात आले. मात्र यामुळे गोंधळात भर पडेल अशी भीती रेल्वे प्रवासी संघटनेकडून व्यक्त करण्यात आली आहे.

मध्य (CENTRAL) आणि पश्चिम रेल्वेच्या (WESTERN RAILWAY) मार्गावरील दादर स्थानकावर (DADAR STATION) फलाट क्रमांकावरून प्रवाशांचा नेहमीच गोंधळ उडतो. या गोष्टीवर उपाययोजना म्हणून पश्चिम रेल्वेच्या (WESTERN RAILWAY) दादर स्थानकावरील फलाट क्रमांक (PLATFORM NUMBER) १ ते ७ क्रमांक आहे तसेच ठेवण्यात येणार आहेत. प्रवाशांना प्लॅटफॉर्म क्रमांक बदलाची सवय लागण्यास उशीर लागेल. तर नवख्या प्रवाशांचा गोंधळ कायम राहणार. रेल्वे प्रशासन गर्दीवर नियंत्रण करण्याऐवजी फलाटांचे क्रमांक बदलण्यात आले आहेत. प्रवाशांच्या हिताचे अनेक निर्णय प्रलंबित ठेवण्यात आले आहेत. रेल्वेचे चौपदरीकरण, रेल्वे मार्गिका वाढवण्यावर भर देणे आवश्यक आहे. तरीसुद्धा अमृत भारत स्थानक विकास योजनेवर भर दिला आहे, असे मत उपनगरीय रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी मांडले.

मध्य रेल्वेवरील फलाट क्रमांक एकला ८ क्रमांक देण्यात आला आहे. यानुसार फलाट क्रमांक तीनला ९, चारला १०, पाचला ११, सहाला १२ तर फलाट क्रमांक सातला १३ आणि फलाट क्रमांक आठला १४ असे क्रमांक देण्यात आले. यामुळे मध्य रेल्वेवर अनुक्रमे ८ ते १४ क्रमांकाचे फलाट राहणार आहेत. याची अंमलबजावणी  ९ डिसेंबर म्हणजेच आजपासून करण्यात आली. यानिमित्ताने, मध्य रेल्वेकडून (CENTRAL RAILWAY) फलक, उद्घोषणा तयार करणे व इतर कामे हाती घेण्यात आली होती. ही कामे पूर्ण झाल्यानंतर आजपासून फलाटांचे क्रमांक बदलण्यात आले आहेत. परंतु, त्यांनतर सुद्धा प्रवाशांमध्ये गोंधळ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हे ही वाचा:

मराठवाड्यात पाणीबाणी, अनेक जिल्ह्यातील गावांना टँकरने पाणीपुरवठा

‘सोंग्या’  चित्रपटात  अभिनेता अजिंक्य ननावरेचा डॅशिंग अंदाज

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss