Saturday, July 27, 2024

Latest Posts

मराठवाड्यात पाणीबाणी, अनेक जिल्ह्यातील गावांना टँकरने पाणीपुरवठा

यंदाच्या वर्षात राज्यभरात अनेक भागात सरासरीपेक्षा कमी प्रमाणात पाऊस पडला आहे.

यंदाच्या वर्षात राज्यभरात अनेक भागात सरासरीपेक्षा कमी प्रमाणात पाऊस पडला आहे. त्यामुळे बहुतांश भागात दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली. तसेच राज्यातील अनेक प्रकल्पांमध्ये खूप कमी प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध आहे. राज्यातील ६ विभागातील धरणांमध्ये अवघ्या ६६ टक्के पाणीसाठी उपलब्ध आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत हा पाणीसाठा २१ टक्क्यांनी कमी झाला आहे. मराठवाडा (Marathwada), विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये आतापासूनच पाणीटंचाई जाणवू लागली आहे. त्यामुळे येणाऱ्या पुढील काळात राज्याला तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.

राज्यातील जलाशयांमध्ये गतवर्षी ८७.१० टक्के पाणीसाठा होता. पण यंदाच्या वर्षी ६६.३१ टक्के पाणीसाठा आहे. सद्यस्थितीला कोकण विभागातील धरणांमध्ये सर्वाधिक ८२.६३ टक्के पाणीसाठा आहे. गेल्यावर्षी हाच पाणीसाठा ८३.१५ टक्के होता. छत्रपती संभाजीनगर (मराठवाडा)विभागात सर्वाधिक कमी 37.63 टक्के पाणीसाठा आहे. गतवर्षी या विभागातील धरणांमध्ये ८७.३१ टक्के पाणीसाठा होता. नागपूर विभागात ७१.७८ टक्के पाणीसाठा असून, गेल्यावर्षी ७९.४९ टक्के पाणीसाठा होता. अमरावती विभागात ७५.६२ टक्के पाणीसाठा असून, गेल्यावर्षी ९१.५२ टक्के पाणीसाठा होता. पुणे विभागात ७०.३९ टक्के पाणीसाठा असून, गेल्यावर्षी ८८.०८ पाणीसाठा होता. नाशिक विभागात ७०.६१ टक्के पाणीसाठा असून, गेल्यावर्षी ८९.८९ टक्के पाणीसाठा होता.

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पुणे जिल्ह्यात १० गावं आणि ६१ वाड्यांवर १२ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. सातारा जिल्ह्यात ६७ गावं आणि २६५ वाड्यांवर ६१ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. नाशिक जिल्ह्यात ३४ गावं आणि २८८ वाड्यांवर ३६ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. सोलापूर जिल्ह्यात ४ गावं आणि ३५ वाड्यांवर ४ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. यंदाच्या वर्षी खूप कमी प्रमाणात पाऊस पडल्यामुळे सगळ्याच जिह्ल्याना त्याचा मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. याचा सर्वधिक फटका मराठवाड्याला बसला आहे. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील बहुतांश भागात पाणी टंचाईला सुरुवात झाली आहे. काही भागात तर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे.

हे ही वाचा:

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मराठा समाज उघड पाडणार, मनोज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मराठा समाज उघड पाडणार, मनोज जरांगेंचा इशारा इशारा

‘अ‍ॅनिमल’मधील गीतांजलीच्या भूमिकेबद्दल रश्मिका मंदानाने केलेली खास पोस्ट चर्चेत

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss