Saturday, March 2, 2024

Latest Posts

संजय राऊतांचा राज्य सरकारवर हल्लाबोल

देशात बेरोजगारी (Unemployment) वाढल्यामुळे तरुणांनी संसदेत घुसखोरी केल्याचे वक्त्यव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी केले आहे.

देशात बेरोजगारी (Unemployment) वाढल्यामुळे तरुणांनी संसदेत घुसखोरी केल्याचे वक्त्यव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी केले आहे. रामलल्लांचे दर्शन घेऊ बेरोजगारीचा प्रश्न सुटणार नाही, असे म्हणत संजय राऊत यांनी सरकारवर निशाण साधला आहे. राज्य सरकार भांडवलदार उद्योगपतींची दलाली करत आहे. दरम्यान धारावी मोर्चाची चेष्टा करणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपवर संजय राऊतांनी जोरदार टीका केली आहे.

देशातील मुख्य मुद्दा हा बेरोजगाराचा आहे. शेतकरी कर्जबाजारी होतोय यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी तोडगा द्यावा असे संजय राऊत म्हणाले. काल धारावीत जो शिवसेनेचा मोर्चा निघाला त्याची मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी चेष्ठा केली. तुम्ही कोणाची दलाली करताय, उद्योगपतीची, असे म्हणत संजय राऊतांनी सरकारवर हल्लाबोल केला. ही मुंबई भांडवलदारांच्या घशातून वाचवण्यासाठी १०६ जणांनी बलिदान दिले आहे, असे संजय राऊत म्हणाले आहेत.

मुंबई मराठी माणसाची आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वत:चं मराठीपण दिल्लीच्या पायाशी गुंडाळून ठेवल्याचे राऊत म्हणाले. शिवसेना मुंबईच्या विकासाशी कधीही आड येत नाही. मुख्यमंत्री काल बोलले मोर्चातील लोक हे बाहेरुन आले आहेत. हो लोक चंद्रावरुन आणले होते असे राऊत म्हणाले. दरम्यान, कालचा मोर्चा हा इशारा मोर्चा होता असेही राऊत म्हणाले. युवकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

हे ही वाचा:

संजय राऊतांचा राज्य सरकारवर हल्लाबोल

संसदेच्या सुरक्षेच्या घटनेबद्दल पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया, म्हणाले…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss