Sunday, March 3, 2024

Latest Posts

धमक्यांचा सत्र सुरूच!, RBI सह मुंबईत ११ ठिकाणी बाँब ठेवल्याच्या धमकीचा आला मेल

आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट नुकतीच समोर आली आहे. आरबीआयच्या कार्यालयात बाँब ठेवण्यात आल्याची धमकी (RBI Mumbai Office Bomb Threat) आली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून देशातील तसेच राज्यातील मोठं मोठ्या व्यक्तींना धमकीचे फोन हे येत आहेत. इतकंच काय तर बई पोलिसांच्या (Mumbai Police) कंट्रोल रुममध्ये येणारे धमक्यांचे फोन काही थांबण्याचं नाव घेईनात. अगदी त्या कॉल्स मध्ये मुंबई उडवण्याची देखील धमकी ही असतेच. यामध्ये कधी कॉल येतात तर कधी मेल येतात. आता तर आरबीआयच्या कार्यालयात बाँब ठेवण्यात आल्याची धमकी (RBI Mumbai Office Bomb Threat) आले आहे. या धमकीमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट नुकतीच समोर आली आहे. आरबीआयच्या कार्यालयात बाँब ठेवण्यात आल्याची धमकी (RBI Mumbai Office Bomb Threat) आली आहे. या धमकीमुळे आत सर्वत्र खळबळ उडाली आहे. मुंबईत एकूण ११ ठिकाणी बॉम्ब ठेवल्याची धमकी देणारा एक मेल मंगळवारी दुपारी आला. दुपारी दीड वाजता हे बॉम्ब ब्लास्ट होणार असल्याचं त्यात म्हटलं होतं. पोलिसांनी या सर्व ठिकाणी शोधमोहीम केली असता काहीही आक्षेपार्ह आढळून आल नाही. त्यानंतर एमआरए मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ईमेलवरून बॉम्ब ठेवल्याची देण्यात आली धमकी. आरबीआय कार्यालय, एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँकेत बॉम्ब ठेवल्याची धमकी देणारा ई मेल आला. त्यामध्ये आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास आणि अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. खिलाफत इंडिया या ई-मेलवरून (Khilapat India) धमकी आल्याची माहिती समोर आली आहे. हा ई-मेल प्राप्त होताच, आरोपींनी ज्या ठिकाणी बॉम्ब ठेवल्याचा दावा केला होता त्याठिकाणी तातडीने शोध मोहीम राबवण्यात आली. पण या शोध मोहिमेत काही आक्षेपार्ह आढळलं नाही. याप्रकरणी पोलीस ठाण्यात आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरु झालाय. हा ई-मेल कुणी केला, त्याचा उद्देश काय होता, याचा तपास मुंबई पोलीस करत आहेत.

हे ही वाचा : 

दिवाळीकरा पण फटाक्यांन शिवाय पालकमंत्री केसरकर यांचे आवाहन

दोन उपमुख्यमंत्री पण विठुरायाची महापूजा कोण करणार?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss