Sunday, May 5, 2024

Latest Posts

वांद्रे-वरळी सी लिंक मार्गावरील टोलमध्ये १ एप्रिलपासून ‘एवढ्या’ टक्क्यांनी होणार वाढ

मुंबईमधील वरळी सी लिंक (Bandra Worli Sea Link) म्हणजेच राजीव गांधी समुद्र सेतूवरुन प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे.

मुंबईमधील वरळी सी लिंक (Bandra Worli Sea Link) म्हणजेच राजीव गांधी समुद्र सेतूवरुन प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. वांद्रे-वरळी सी लिंकवर १ एप्रिलपासून प्रवास करणाऱ्या सर्व नागरिकांना जास्तीचा टोल भरावा लागणार आहे. या मार्गावरील टोलमध्ये वाढ करण्यात आली आहे. वांद्रे वरळी सी लिंकवरील टोलमध्ये १८ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. वाढवण्यात आलेल्या टोलमुळे मुंबईकरांच्या खिशाला कात्री लागण्याची शक्यता आहे. हा रस्ता मार्ग पश्चिम उपनगरांना शहराच्या दक्षिणेकडील भागातील जोडण्यासाठी तयार करण्यात आला आहे.

वांद्रे-वरळी सी लिंकवर टोल वाढल्याने सेतू मार्गावरून प्रवास करणाऱ्या सर्व नागरिकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. वाढलेल्या टोलनुसार कार आणि जीपचे टोल ८५ रुपयांवरून १०० रुपयावर जाणार आहे. तर मिनीबस टॅम्पो आणि इतर वाहनांमधील प्रवाशांना १३० रुपयांवरून १६० रुपये वाढ करण्यात आला आहे. एकेरी प्रवासासाठी १७५ रुपये ऐवजी दोन एक्सेल ट्रकसाठी २१० रुपये टोल घेतला जाणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने टोल दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वाढवण्यात आलेल्या टोलची अंमलबजावणी १ एप्रिलपासून लागू केली जाणार आहे. माहीम दादर प्रभादेवी वरळी या भागातील ट्रॅफिक कमी होण्यासाठी पश्चिम उपनगरातील वाहन चालक या मार्गाचा वापर करतात. याच सागरी सेतुला आता धर्मवीर छत्रपती संभाजी राजे सागरी किनारा मार्ग सुद्धा जोडला जाणार आहे. हा सागरी मार्ग जोडल्यानंतर अजून वाहनांची वर्दळ वाढणार आहे.

वांद्रे-वरळी सी लिंक मार्गावरील टोल वाढल्याने अन्य काही ठिकाणी देखील तोल वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये पुणे-सातारा महामार्गाचा देखील समावेश असल्याचे सांगण्यात आले आहे. पुणे-नाशिक महामार्गावरील टोलमध्ये देखील वाढ केली जाणार आहे. ही दरवाढ १ एप्रिलपासून लागू केली जाणार आहे. त्यामुळे आता रस्ते प्रवास महागणार आहे. या वाढत्या महागाईचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसला आहे. सेतू मार्गावरील टोलमध्ये अडीच टक्क्यांनी टोलमध्ये वाढ करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

उन्हाळ्यात ‘सफरचंद दालचिनीचे’ पाणी ठरेल उपयुक्त

राणा आणि राणेंचा वेगवेगळा खेळ, कसा घालणार विरोधक विजयाचा मेळ? | Loksabha Elections 2024

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss