मुंबईतील भाऊच्या धक्क्यावर अनेकजण मासे आणण्यासाठी जातात. पण आज सकाळी भाऊच्या धक्क्यावर एक दुःखद घटना घडली आहे. मच्छिमारांच्या नौकेत दोघांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. यामध्ये गुदमरलेल्या एका व्यक्तीची प्रकृती गंभीर आहे तर तिघांची प्रकृती स्थिर आहे. मृत्यू झालेला आणि बेशुद्ध पडलेले दोघेही मूळचे आंधप्रदेशमधील रहिवासी आहेत. ते दोघंही भाऊच्या धक्क्यातून मच्छी बोटीतून बाहेर काढण्याचे काम करायचे. पण आज सकाळी पहाटेच्या सुमारास या दोघांचा मच्छिमार बोटीत गुदमरून मृत्यू झाला आहे.
भाऊच्या धक्क्यावर पहाटे दोन वाजताच्या सुमारास अंजनीपुत्र नौका किरण भाई तांडेल यांनी न्यू फिश जेटी येथे आणली होती.नौका आणल्यानंतर तीन खणातील मच्छी विकण्यासाठी काढण्यात आली. त्यानंतर सकाळी ११ वाजताच्या सुमारास एक कामगार इतर खणांतील मासे काढण्यासाठी नौकेमध्ये उतरला. त्यानंतर त्याला अचानक अस्वस्थ वाटू लागले आणि तो बेशुद्ध पडला. त्याला बघण्यासाठी अन्य दोघे जण आतमध्ये उतरले आणि त्यांनी त्या कामगाराला बाहेर काढले. अंजनीपुत्र नौकेत जेव्हा इतर कर्मचारी उतरले तेव्हा त्यांना बी. श्रीनिवास यादव आणि नौकेचा मालक नागा डॉन संजय हे दोघंही बेशुद्ध अवस्थेमध्ये सापडले. त्यानंतर बोटीतील बाकीचे तिघेही बेशुद्ध पडले होते. बेशुद्ध पडलेल्या दोघांना लगेच बोटीतून बाहेर काढल्यानंतर जे. जे. रुग्णालयात नेण्यात आले.मात्र डॉक्टरांनी तपासून बी श्रीनिवास आणि नागा डॉन यांना मृत घोषित केले. त्यातील सुरेश मेकला या व्यक्तीला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे तर बाकीच्या तिघांची प्रकृती स्थिर आहे.
नौका दुर्घटनेच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. या घटनेचे व्हिडिओ देखील समोर आले आहेत. त्यातच आज मच्छिमार नौकेत तरुण उतरल्यानंतर तो बेशुद्ध पडला. त्यातच या तरुणाचा मृत्यू झाला आहे. या घटनेत मृत्युमुखी पडलेले दोन्ही तरुण परराज्यातील आहेत. या घटनेमध्ये गंभीर असलेल्या तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
हे ही वाचा:
SBI ची आणली मस्त योजना!, ४०० दिवसांच्या गुंतवणुकीवर मिळणार भरघोस व्याज…